दरवर्षी प्रमाणे यंदाही अस्मिता सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणारी संस्थेमार्फत जोगेश्वरी येथे भव्य रांगोळी स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे. श्री. विनायक पेडणेकर, श्री.सुधीर गोरे ह्यांच्या सहकार्याने आणि श्री संकेत भगत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या वर्षाच्या रांगोळी प्रदर्शनात प्राप्ती पेडणेकर, रोहिणी जाधव, सुजाता सैल, मिताली गार्डे, शुभम जाधव, त्रिशला रहाटे, करण पांचाळ, सायली खानविलकर, मयुरेश सुर्वे, वैभव काशीकर, निधि पावसकर, चंद्रशेखर पांचाळ, आस्था बाथरे, सुचिता सुतार, ऋषी गौरत, निखिल गुरव, वृध्दी मोरजकर ॲड. रोहिणी जाधव इत्यादी रांगोळी कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे. सदर प्रदर्शनाला मराठी, चित्रपट आणि मालिका मधील कलाकार भेट देणार आहेत. हें प्रदर्शन मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर ते रविवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ६ ते ९ ह्या वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे स्थळ : अस्मिता भवन, ट्रॉमा हॉस्पिटलच्या बाजूला, जोगेश्वरी मेट्रो स्टेशन समोर. मुंबई ६०.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment