Skip to main content

अंगुलिमाल उराडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा"हे विश्व शब्दांचे" या नावातच व्यापकता

सुनील शिरपुरे/यवतमाळ
चंद्रपूर:-१ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा "हे विश्व शब्दांचे" हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे.
            या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात "हे विश्व शब्दांचे" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे, स्मिता कुंभारे, अरुण झगडकर उपस्थित होते.
          "हे विश्व शब्दांचे" या काव्य संग्रहाचे प्रकाशन करताना कवी अंगुलिमाल उराडे आणि त्यांची आई मायाबाई उराडे यांचा शाल, सन्मानचिन्ह, साडी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
            साहित्यिकतेच्या मुळाशी जाणारा हा कवितासंग्रह शब्दांच्या माध्यमातून मानवी भावनाचा शोध घेतो. या संग्रहातील कवितानी प्रेम, वेदना, संघर्ष आणि आशेची नवी परिभाषा उलगडली आहे. कवितामधील शब्दांचे वजन आणि त्यातून व्यक्त होणा-या भावना या वाचकाच्या मनाला भिडणा-या आहेत. असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमुद केले. आनंद विद्यालयाचे श्री पी. डी. वाळके सर यांनी प्रास्ताविक सादर करताना कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले. चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री. अरुण झगडकर यांनी कविता संग्रहावर भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. कार्यक्रमात आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे सर, स्मिता कुंभारे मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत कविताच्या सामाजिक आणि वैयक्तिक महत्वावर भर देत कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांचे भरभरून कौतुक केले. पहिल्या सत्रातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे संचालन मा. रोशनी दाते यांनी उत्कृष्ट आणि प्रभावीपणे केले, तर कवी अनुराग गोवर्धन यानी आभार प्रदर्शन केले.
            तर दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाध्यक्षस्थानी गीता देव्हारे-रायपुरे होत्या, तर प्रमुख अतिथी विरेन खोब्रागडे, अर्जुमन बानो शेख, सुनील बावणे उपस्थित होते. कवी संमेलनात रोशनी दाते, सुमेधा श्रीरामे, आरती रोडे, यामिनी मडावी, नागोराव सोनकुसरे, एम.ए. रहीम, नागसेन साहारे, नटराज गेडाम, मिलिंद खोब्रागडे, भारती लखमापूरे, साईनाथ रहाटकर, वैजयंती गहूकर, डॉ. शिलवंत मेश्राम, तनुजा बोढाले, संगीता पिज्दूरकर, किरणकुमार बोरुले, सीमा वैद्य, राज संदोकर, सीमा भसारकर, अमृता मनोहर, सुभाष गेडाम, महेश येरमलवार, राधिका झरकर, लोमेश देशमुख, किरण चौधरी इ. कवी कवयित्रींनी सहभाग घेऊन उपस्थित काव्य रसिकांची भरभरून मने जिंकली. प्रशांत भंडारे यांनी या कवी संमेलनाचे उत्कृष्ट असे संचालन करून काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले.
            अंगुलिमाल उराडे यांची तोकडी परिस्थिती असतानाही कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन हे अत्यंत चांगले आणि दर्जेदार होतं. येणा-या सगळ्या पाहूण्यांविषयी आपुलकीची भावनाही तितकीच प्रबळ जाणवली. पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानंतर झालेले कवी संमेलन दोन्ही कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध झाले. हा सोहळा प्रसन्न आणि अगदी खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात पार पडले. अंगुलिमाल उराडे आणि त्याचा मित्र पंकज वाळके, त्यांचे काका गुरुदास उराडे, अंगुलिमाल यांची भाची कु. मानसी शेंडे तसेच आनंद विद्यालयाचे लिपिक श्री. निखिल भामदारे आणि श्री. शरद गनलावार यांनी तितक्याच तन्मयतेने काम करताना दिसले. सरतेशेवटी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली.
           उत्साही साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळयाने परिसरातील साहित्यिक वातावरणाला नव संजीवनी दिली. "हे विश्व शब्दाचे" हा काव्य संग्रह नक्कीच नव्या साहित्यिक प्रवाहाला चालना देईल, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...