Skip to main content

मी बोललचं पाहिजे


हा हा मी मी बोललचं पाहिजे
आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही
हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे
माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक
ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार
किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते?
देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून
काय आणि कसे सांगू ग आतून किती  मी तुटते
किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते
माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला?
कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म
पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना..
मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी
तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात..
त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते
समजते मला तुमची आतुरता,तळमळ ..
पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?....
त्याची माय,बहिण,भार्या,लेक का दिसत नाही त्याला माझ्यात
आपले संस्कारच कमी पडतात का ? असे चित्र पाहिल्यावर वाटते
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

मी का या समाजातील काही दृष्ट लोकांच्यासाठी एक खेळणं आहे का ?
माझ्या मनाचा,जीवनाचा विचार ही यांच्या मनाला शिवत नाही
निरागस,निष्पाप लेकीसह,सरणावर जाणारी माय ही येथे सुरक्षित नाही
वासना इतकी कशी बळावली याचा विचार कोणी कधी केला का?
प्रश्न विचारा प्रत्येकाने स्वतः ला याला मीच तर जबाबदार नाही ना?
याचे उत्तर हो असेच येईल..कारण तेच सत्य आहे
याला आपणच जबाबदार आहोत,कारण अशी जनावरे सावज शोधून शिकार करतात तेव्हा त्यांना आपणच पाठीशी घालतो....
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

न्यायदेवतेचे डोळे जरी आता उघडे केले तरी ती अंधाचेच सोंग घेते...
न्याय व्यवस्थेने त्यांची पुराव्या अभावी किंवा कागदपत्रे बदलून
अलगद अशा जनावरांची सुटका केली जाते ती ही पैशाच्या जोरावर
तेव्हा कोठे जातात आपल्यातील छत्रपती शिवाजीचे विचार..
कोठे जाते माणुसकी? लाज,शरम सारी गुंडाळून जणू ठेवून देतात
अशी जनावरे बहुतेक जवळची म्हणजे घरातीलच असतात...
त्याचाच ती गौर फायदा घेतात..अन् माणुसकीला काळीमा फासतात ..
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

पूर्वीची न्याय व्यवस्था आठवा कशी होती अव्वल,प्रबळ,विश्वासू
चुकीला तेव्हा माफी ही कधीच नव्हती,पळवाटा तर बिल्कुल नव्हत्या
तेव्हाही अशी काही कृत्य थोड्याप्रमाणात घडत होतीच,पण तेव्हा वचक होती,शिस्त होती..
आता कोठे गेला तो न्याय,निवाडा,ती वचक?
दुराचार असाच जर फोफाळला तर जगणेच मुश्किल होवून जाईल..
सगळीकडे अराजकता माजेल,हाहाकार होईल
विश्वास तर कधीच गमावून बसलेले आपण,माणूस म्हणून तर कायमचे हरू
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

घरोघरी संस्कारांची पेरणी ही बालपणीच होणे गरजेचे
प्रत्येकाच्या घरात शांत, संयमी,भावनिक,विश्वासू संस्कार व्हायला हवे 
पुरातन,बोधपर कथांचे वाचन,स्मरण होणे,गरजेचे आहे
परकीय परंपरांना तीलांजली देवून..आपल्या संस्कृतीची रुजवण व्हावी
हरेकाच्या मुखावर मायबापाच्या कर्तृत्वाचा,नावाचा जागर व्हावा
आई बाप,शिक्षक,निसर्ग हेच आपले गुरू मानले पाहिजे..
भगवतगीता,गाथा,संविधान सर्वत्र बोलबाला व्हावा
चुकीला माफी नसावी,न्याय निवाडा ताबडतोब व्हावा
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

काही कळ्या खुलण्यापूर्वीच कुस्करल्या जातात,गर्भातच मारल्या जातात
तर काही अशा जनावरांची शिकार होतात
तर काही भर रस्त्यावर,दिवसा ढवळ्या शिकार होतात
यांच्या कृत्याची शिक्षा ताबडतोब देणारा पुन्हा माझा शिवराय जन्मावा..
ज्यांच्या हातात सर्व माणुसकी सत्ता असेल,ज्याला कोमल हृदय असेल
सर्वात महत्त्वाचे प्रथम त्याने संविधान जाणलेले असेल..
संविधान डोक्यावर घेवून न नाचता,त्याच्या हरेक पानांचा,शब्दांचा अर्थ समजून घ्यावा
भाव भक्तीचा मेळा,तुकोबाची वारी,घराघरांतून निघावी
संस्कार हे कृतीतून, बोलीतून,वागणुकीतून दिसावे
तरच या भारतातील हरेक महिला,पुरुष सुरक्षित राहील
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...