Skip to main content

शीर्षक - तू....


जेव्हा जीवन सुंदर बहरलेले असते
तेव्हाच अचानक वावटळ यावी
आणि सारे होत्याचे नव्हते होणे
काय घडते हे समजण्याच्या पलीकडील
ज्यांच्या सोबत इतके वर्षे आपण विश्वासाने राहतो
अन् तीच व्यक्ती अचानक आपल्या जवळून,आपल्या डोळ्यासमोर
कोणीतरी कायमची दूर घेवून जातो 
आपल्याला पूर्ण एकटे कडून
काय मिळते या नियतीला 
घराचे सारे घरपणच निघून जाते
जो दरारा असतो भोवताली
तो ही त्या सोबत नाहीसा होतो..
एखाद्या आश्रितासारखं जीवन होवून जात.. 
दोन फुले आताच कोठे कळी तून बाहेर आलेली असतात
त्यांना भक्कम आधारावर बहरायचे असते
पण,तो त्यांचा आधारच काढून घेतला जातो
दोन्ही चाकापैकी एक चाक जेव्हा निखळते
तेव्हा जीवन रथ एक चाक किती दिवस हाकणार ना?
कसोटी कायमच पाचीला पुजलेली असते का?
हीच का सटवी
जी सर्व काही लिहून जाते पाचवीला..
ते ही काहीच व्यक्तींच्या बाबतीत...
काही खूप भाग्यशाली असतात..
त्या फुलांचा काय दोष असतो..
त्यांना यांनीच जन्माला घातलेलं असते
आणि मध्येच एखादा त्यांना पोरका करून जातो
तेव्हा त्यांनी कोणाकडे पहायचे?
ते चाक जर स्व बळावर चालत असेल तर ठीक
नाहीतर रोजच्या जगण्याचा प्रश्न? भाकरीचा प्रश्न?
नव्हे प्रश्न मालिका सुरू होते
तेव्हा कोणी कोणाच्या कामा येत नाही
दुरून सल्ले देणारे हजारो असतात
पण,प्रत्यक्षात मदत करणारे कोणीच नाही?
फुकटचा सल्ला कोणीही देते ओ?
स्वतः च्या दाराच्या फटीतून सारी गंमत पहात बसायची
काय म्हणायचे याला तुम्हीच सांगा?
कोणता प्रसंग कोणावर कधी,कसा येईल 
कोणीच,काहीच सांगू शकत नाही..
हे च जीवन आहे....
तुझ्या नंतरची ही पंधरा वर्षे 
रोज एक एक दिवस मोजला
प्रत्येक दिवसाचा हिशोब देवू का?
तू ही थकून जाशील?
तू ही म्हणशील,मला नसते इतके शक्य?
आपले फिरणे ही राहून गेले..
चार भिंती बाहेरचे जग पहायचे होते?
मनसोक्त बागडायचे होते?
निसर्गाशी हितगुज करायची होती?
मंद हवेची झुळूक अनुभवायची होती
पौर्णिमेच्या रात्री मस्त फिरायचे होते
माझी स्वप्न ही स्वप्नच राहिली?
परदेश वारी चे इतके अप्रुप कधीच नव्हते
आपलाच भारत म्हण किंवा महाराष्ट्र तरी या डोळ्यांनी मन भरून पहायचा होता
ते ही आपल्या हक्काच्या व्यक्तीसोबत
ते खरे जगणे असते 
मिर्ची भाकर माझी सर्वात आवडती
हॉटेलची ही कधी मला आवड नव्हती
असो,आपली लेकर आता मोठी झालीत
माझ्या शब्दांनी सर्वजग फिरून येते..
तू काळजी करू नकोस?
जगते अन् जगणारच
अन् असे रडत कढत जगणे मला जमत नाही
भरपूर चिडते,रडते,ओरडते,व्यक्त होते
पण,पुन्हा मी माझी होते...
शांत होते...
पण,आतून विषमतेची आग चैन पडून देत नाही...
कोणताही अपराध नसतांना दिलेली वागणूक
मला सहन होत नाही
मी आवाज उठवते
दबवण्याचा खूप हात प्रयत्न करतात
नको ते वार करतात?
पण,हार कधी मारत नाही
नको तेथे झुकत नाही
बैल दूध देत नाही तर देतच नाही
नुसती बैला सारखी मान हलवणे मला जमले नाही
आणि कदापी जमणारही नाही...
आपली लेकरं ही भरारी घेतील..
त्यांनीही माणुसकी जपली..
माणुसकीचे पुजारी जो होतो तोच 
खरा माणूस म्हणून घेण्यास लायक ठरतो
तशी दोन्ही ही लेकरं आहेत...
फक्त त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे इतकीच अपेक्षा...
तू ही सर्व पहात असणार...
तुझेही आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच..

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...