Skip to main content

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ 
महामानवांनी केलेले कष्ट, त्याग आणि दिलेले परिवर्तनवादी विचार साहित्यातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कवींनी आणि गायकांनी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांतून आपल्या कविता आणि गीतातून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे अध्यक्षीय भाषणात कवी विनोद अष्टुळ यांनी आपले मत व्यक्त केले. 
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सव २०२५ मध्ये रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन वाडिया कॉलेज समोर पुणे येथे संपन्न झाले.  हे साहित्य सम्राटचे १९९ वे कवी संमेलन होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.
 विचारपीठावर स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, विशेष अतिथी मा.रवींद्रअण्णा माळवदकर, ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे, तुकाराम डावरे रा.अध्यक्ष केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली, संमेलन अध्यक्ष विनोद अष्टुळ,  आणि मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते. 
कवी आणि संमेलनाध्यक्ष विनोद अष्टुळ यांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत रतनलाल सोनाग्रा आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्य अतिथी रवींद्रअण्णा माळवदकर म्हणाले की कोणत्याही जाती धर्माचा उत्सव साजरा करताना प्रामुख्याने समाज प्रबोधन झालेच पाहिजे. तसेच
ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे यांनी विचार व्यक्त केले की कवींनी वास्तवावर निर्भीडपणे सादरीकरण केले पाहिजे. या कवी संमेलनामध्ये पुणे शहराच्या विविध विभागातून आलेले दिग्गज कवी त्यामध्ये राहुल भोसले, संजय माने, बी एन चव्हाण, संजय भोरे, देवेंद्र गावंडे, विकी कांबळे, अशोक सोनवणे, जितेंद्र सोनवणे, सुरेश लोखंडे, अशोक वाघमारे, गीतांजली देवाळकर, राम सर्वगोड, चंद्रकांत गायकवाड, सौरभ नवले, निरंजन ठणठणकर, विजय जाधव, प्रा.बाबासाहेब जाधव, विठ्ठल गायकवाड आणि दादासाहेब सोनवणे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कवितांनी रमाई महोत्सवातील रसिकांची मने जिंकली. सर्व कवी आणि गायकांचा सन्मान लताताई राजगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कवी संमेलनाचे प्रबोधनात्मक निवेदन कवी विनोद अष्टुळ यांनी तर असे प्रबोधनात्मक एक दिवशीय कवी संमेलन लवकरच आयोजित करू असे आभार व्यक्त करताना अविनाश साळवे यांनी विचार मांडल

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...