Skip to main content

मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूह महाराष्ट्र या समूहाचे तिसरे साहित्य संमेलन दिनांक ९/०२/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 हे साहित्य संमेलन प्रसिद्ध कवी/ व्याख्याते/ निवेदन मा. गजानन उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.निता श्रीश्रीमाळ, विस्तार अधिकारी मा. विद्या दीक्षित, विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मा.अनिल साखरे ,ज्येष्ठ कवी डॉ. शिवा प्रधान व मा .दत्तात्रय भोसले, प्रमुख अतिथी म्हणून मा.भालगडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात स समूहाच्या संस्थापिका अल्का धोंडणे- साखरे  यांनी समूहाचा आलेख वाचून दाखवला. दीपोत्सव मैत्रीचा या दिवाळी अंकाचे प्रकाशन व साहित्य क्षेत्रात आपल्या कार्यातून कवितेतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कवियत्री यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटक नीता श्री श्रीमाळ व विद्या दीक्षित यांनी  यावेळी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. डी. आर. बांगर सरांचे बदल या विषयावरचे कथाकथन प्रभावी ठरले. शिवा प्रधान यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व आजचा युवक यावरील परिसंवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भोजन कालावधीत सुगम संगीतांचा रंगतदार कार्यक्रम घेण्यात आला. सचिन वालतुरे ,अनिल केंगार ,समाधान लोणकर ,गजानन उफाडे इत्यादींनी सुंदर गीतांची मेजवानी दिली. दुपार सत्राचे कवी संमेलन मा. गजानन उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. सामाजिक, राजकीय, मायबाप लेक, नोटबंदी ,प्रेम ,निसर्ग इत्यादी विविधांगी विषयावर कविता सादर करण्यात आल्या. या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे कवी निवृत्ती कानवडकर यांची वेशभूषेतील वासुदेवाच्या कवितेने सर्वांचे लक्ष केंद्रित केले. पाच उत्कृष्ट कविता निवडून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.  मॅन ऑफ द संमेलनाने अनिल केंगार सांगोला यांना सन्मानित करण्यात आले. सर्वात शेवटी गजानन उफाडे सरांचे अध्यक्षिय भाषण लक्षवेधी ठरले. सरांनी कवितेबद्दल लिहिताना सांगितलं की सर्वांनी वास्तवावरच्या कविता भरभरून लिहाव्यात. विद्रोही कविता म्हणजे फक्त शिव्या देणे नसून समाजातील कटू सत्य कवितेतून लोकापर्यंत पोहोचवावे व या माध्यमातून जनजागृती करावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सचिन वालतुरे व मधुकर्णिका  यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापिका/ आयोजिका अल्का धोंडणे- साखरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...