Skip to main content

Posts

पंढरपूर येथील उपोषण करणारे दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसले आहेत.त्यापैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.धनगर समाजाचा वाघ समजले जाणारे दिपक बोराडे खूपच धडाडीचे कार्यकर्ते आहेत.धनगर समाजाला अशा लढवय्या कार्यकर्ता ची नितांत गरज आहे.दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपोषण स्थळी असलेले समाज बांधव हवालदिल झाले आहेत.अनेकांच्या अश्रू चा बांध फुटला.तेथील उपस्थित सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते आपल्या अश्रूं भरलेल्या डोळ्यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पंढरपूर ला उपोषण स्थळी येण्याचे आवाहन करीत आहेत.तीन दिवस होऊनही शासनाने या उपोषणाची साधी विचारपूस ही केली नाही, जाणीव पूर्वक धनगर समाजाच्या राज्य व्यापी आमरण उपोषणा कडे दुर्लक्ष केले,जर उपोषण कर्त्या ला काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी शासनाची असेल, धनगर समाज बांधव पूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.प्रकृती च...

पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणा कडे धनगर नेत्यांनीच फिरविली पाठ

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाचे समाज बांधव एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता उपोषणाला बसले आहेत परंतु पहिल्या दिवसापासून आज तिसऱ्या दिवसांपर्यंत एक ही धनगर समाजाचा नेता या ठिकाणी आलेला नसल्याने धनगर समाज बांधव नेत्यांच्या या वागणूकीवर नाराज असल्याचे चित्र उपोषण स्थळी दिसून येते.उपोषणाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागातून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते, धनगर समाजाचे मान्यवर मार्गदर्शक,व इतर कार्यकर्ते या राज्य व्यापी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी झालेल्या सर्व कार्यक्रमात उपस्थित होते.ना नेता ना पक्ष आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष, जुने च काम नव्या दमाने करायचे या उद्देशाने जरी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी आमरण सुरू केले असले तरी आजी माजी नेत्यांनी आपण एक समाज बांधव या नात्याने तरी उपस्थित राहयला हवे होते.अशी चर्चा उपोषण स्थळी होताना दिसत होती.पहिल्या दिवशी अभ्यास पूर्ण सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य कार्यकर्ते विजय गोफ...

*उर्से गावात कवी.संदीप पवार यांचा धनंजय कला , क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार

  पालघर : दिनांक ९/२४  "धनंजय कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उर्से" यांच्या सौजण्याने दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच नाव लौकिक केलेल्या तरुण वर्गाचा सत्कार केला जातो आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षी कवी. संदीप पवार यांना ही गावकऱ्यांच्या वतीने गणेशउत्सवाचे निमित्त साधून मंडळाचे अध्यक्ष श्री.राजकुमार पाटील श्री.विराज पाटील ,ज्येष्ठ नागरिक श्री.राजू पाटील तसेच गावातील विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे श्री.विजय जाधव सर ,पत्रकार संतोष पाटील तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने संदीप पवार यांचा शाळ ,श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . कवी.संदीप पवार यांचे पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील उर्से हे गाव . याच गावात ते लहानाचे मोठे झाले .खऱ्या विचारांचं सिंचन याच गावातून झाले.इथल्या वरिष्ठ तसेच गुरूंच्या मार्गदर्शनाने , आई वडिलांच्या ,कुटुंबाच्या आशीर्वादाने आज संदीप पवार यांना कवी ,लेखक ही उपाधी मिळाली. संदीप पवार यांचा ' प्रतिकार ' हा काव्य संग्रह काही महिन्यापूर्वी प्रकाशित झाला .या वर्षी संदीप पवार यांना "आ...

यांचा घरगुती गणपती बाप्पा आपली कृपाभिलाषी सौ. सरोज गाजरे भाईंदर

सालाबादप्रमाणे यंदाचा उज्वल मित्र मंडळ, भाईंदर , ठाणे (खानदेशचे रहिवासी ) यांचा हा ४७ वा गणपती माझी जाऊ यामिनी गोपाळ गाजरे, दत्तात्रेय भवन, भाईंदर पूर्व येथे स्थापित झाला. जवळपास २०० कुटुंब एकत्र येऊन दरवर्षी हा गणपती मंडळातील एका सदस्याकडे आणून सर्व मिळून साजरा करतात. मी सौ. सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे यांच्याकडे हा मान यापूर्वी तीनवेळा येऊन गेलाय. या वर्षीचा गणपतीचे येत्या १२ सप्टेंबर गौरी बरोबर विसर्जन करण्यात येणार आहे.  रविवारी आठ  तारखेला सत्यनारायण महापूजा अन् महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . बहुतेकांनी गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री. लढे यांचं खानदेशी थाटाचं जेवण इतरांना ही खूप आवडलं. पत्ता : दत्तात्रेय भवन, अभिनव शाळेजवळील इमारत. भाईंदर, पूर्व  आपली कृपाभिलाषी  सौ. सरोज गाजरे भाईंदर