सोमवार दिनांक 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसले आहेत.त्यापैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.धनगर समाजाचा वाघ समजले जाणारे दिपक बोराडे खूपच धडाडीचे कार्यकर्ते आहेत.धनगर समाजाला अशा लढवय्या कार्यकर्ता ची नितांत गरज आहे.दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपोषण स्थळी असलेले समाज बांधव हवालदिल झाले आहेत.अनेकांच्या अश्रू चा बांध फुटला.तेथील उपस्थित सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते आपल्या अश्रूं भरलेल्या डोळ्यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पंढरपूर ला उपोषण स्थळी येण्याचे आवाहन करीत आहेत.तीन दिवस होऊनही शासनाने या उपोषणाची साधी विचारपूस ही केली नाही, जाणीव पूर्वक धनगर समाजाच्या राज्य व्यापी आमरण उपोषणा कडे दुर्लक्ष केले,जर उपोषण कर्त्या ला काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी शासनाची असेल, धनगर समाज बांधव पूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.प्रकृती चिंताजनक असलेले दिपक बोराडे यांचे कडे नेतृत्व, वक्तृत्व,गुण आहेत.शासनाने या धनगर समाजाच्या राज्य व्यापी आमरण उपोषणाकडे लक्ष देऊन त्यांच्या संविधानात समाविष्ट असलेले एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment