Skip to main content

Posts

प्रसिद्ध कवी.संदीप पवार यांचा समाजभान जागृत करणाऱ्या ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला सरकारमान्य मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर

नुकताच आदर्श शिक्षक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध कवी संदीप पवार लिखित व पलपब प्रकाशनद्वारा प्रकाशित समाजभान जागृत करणारा ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर झाला आहे .हा पुरस्कार ३ ऑक्टोंबर रोजी ठाणे येथे पुरस्कृत करण्यात येणार आहे . कमी कालावधीत जनमाणसात पोहचलेला काव्यसंग्रह वाचकांच्या मनात ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.' प्रतिकार ' या काव्यसंग्रहाचे यश आणि कवी.संदीप पवार यांच्या साहित्य सेवेचे  कौतुक म्हणून पलपब पब्लिकेशनद्वारा यावर्षी त्यांना "राज्यस्तरीय पलपब जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने गौवरव करण्यात आला .प्रतिकार काव्यसंग्रहाचा आलेख आणखीनच वाढत चाललेला आहे .या काव्य संग्रहाच्या प्रती वाचकांसाठी  पलपब बुक स्टोरवर आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे .तसेच संदीप पवार यांच्या व्हॉट्सअँप नंबर ९२०९७७७७८५ या क्रमांकावरून कॉल करून आपली प्रत मागवू शकता . लिमिटेड स्टॉक उपलब्ध आहे .

*लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रतिभा साहित्य संघाचा प्रथम पुरस्कार जाहिर

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन- नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यीक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या जिमीन या कथेस अकोट तालुका, जि.अकोला या विदर्भातील ख्यातनाम प्रतिभा साहित्य संघाचे वतीने आयोजीत "उत्सव पीक पाण्याचा" यातंर्गत कथा स्पर्धेत प्रथम क्रंमाक मिळाला असल्याची माहिती प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक विशाल कुलट व सचिव सागर तळेकर यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये दिली आहे.   या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातुन तब्बल २८७ कथा आलेल्या होत्या. यातुन गायकर यांच्या कथेस प्रथम स्थान मिळाले आहे.   पत्रकार, लेखक व किर्तनकार म्हणुनही प्रसिद्द असलेल्या नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना कथा व कविता लेखनात या पुर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.   सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी अकोट, जि.अकोला (विदर्भ) येथील वसुंधरा माध्यामिक विदयालयात सायं.७ वा.आयोजीत करण्यात आला आहे.   दरम्यान गायकर यांच्या या यशाचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र सह विविध साहित्यीक संस्था,पत्रकार संघ,साहित्यीक मान्यवर व अनेकविध ...