भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती समजले जाणारे बस स्थानक स्वारगेट (पुणे) बस स्थानक परिसरात गैरसोयी मुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झालेला असून तेथील महामंडळ प्रशासन मात्र मस्त असल्याचे दिसून येते,या बस स्थानकात मोटार सायकल,चार चाकी वाहने, रिक्षा,बस स्थानक च्या डाव्या व उजव्या बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात, साहजिकच बाहेरुन येणाऱ्या बसेसची कोंडी होते,बस स्थानक च्या प्रवेशद्वारा जवळ आत पर्यंत रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात.येथून आत येणाऱ्या बसेसना अडथळा निर्माण होतो व स्थानका बाहेर बसची रांग लागली जाते व वाहतूक कोंडी होते.प्रवाशांना पायी चालत बस स्थानकात प्रवेश करताना अडचण निर्माण होते.बस स्थानका बाहेर पार्किंग ची सोय नसल्याने प्रवाशांना सोडायला आलेल्या चार चाकी वाहनाची गर्दी येथे दिसून येते, साहजिक बस स्थानकात वाहतूक कोंडी निर्माण होते.बस स्थानकातील वेड्या वाकड्या जागेमुळे मुक्कामाला बाहेरुन आलेल्या बस अस्ताव्यस्त लावलेल्या असतात.शेड क्रमांक २५ ते २८ नवीन सुरु करण्यात आले असून रात्री तिथे मुक्कामी आलेल्या बसेस अस्ताव्यस्त लावल्या असल्याने श...