Skip to main content

स्वारगेट (पुणे) बस स्थानकातील गैरसोयी मुळे प्रवाशी त्रस्त तर महाराष्ट्र परिवहन महामंडळ मात्र मस्त.


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती समजले जाणारे बस स्थानक स्वारगेट (पुणे) बस स्थानक परिसरात गैरसोयी मुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झालेला असून तेथील महामंडळ प्रशासन मात्र मस्त असल्याचे दिसून येते,या बस स्थानकात मोटार सायकल,चार चाकी वाहने, रिक्षा,बस स्थानक च्या डाव्या व उजव्या बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात, साहजिकच बाहेरुन येणाऱ्या बसेसची कोंडी होते,बस स्थानक च्या प्रवेशद्वारा जवळ आत पर्यंत रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात.येथून आत येणाऱ्या बसेसना अडथळा निर्माण होतो व स्थानका बाहेर बसची रांग लागली जाते व वाहतूक कोंडी होते.प्रवाशांना पायी चालत बस स्थानकात प्रवेश करताना अडचण निर्माण होते.बस स्थानका बाहेर पार्किंग ची सोय नसल्याने प्रवाशांना सोडायला आलेल्या चार चाकी वाहनाची गर्दी येथे दिसून येते, साहजिक बस स्थानकात वाहतूक कोंडी निर्माण होते.बस स्थानकातील वेड्या वाकड्या जागेमुळे मुक्कामाला बाहेरुन आलेल्या बस अस्ताव्यस्त लावलेल्या असतात.शेड क्रमांक २५ ते २८ नवीन सुरु करण्यात आले असून रात्री तिथे मुक्कामी आलेल्या बसेस अस्ताव्यस्त लावल्या असल्याने शेड कडे प्रवाशी जात नाहीत,व बसेस सुध्दा जात नाही.वाहतूकीची कोंडी मुळे बाहेर रस्त्यावर बसेस उभ्या करून काही बस कंडक्टर बस स्थानकात येऊन प्रवाशांना बस कडे घेऊन जातात, प्रवाशांना जड सामान बाहेर बसकडे घेऊन जाताना खूपच त्रास सहन करावा लागतो.खाजगी वाहनाचे दलाल स्वारगेट बस फिरुन प्रवाशांना खाजगी वाहनाने पुढील प्रवासासाठी घेऊन जातात.पावसाळा नसतानाही तेथील तुटलेल्या गटाराचे पाणी बस स्थानकात ठिक ठिकाणी जमा होते, बाहेर गावाहून बस या स्थानकात आणणे व तेथून बाहेर पुढील प्रवासासाठी जाणे म्हणजे चालकांच्या दृष्टीने तारेवरची कसरत असते.प्रवाशांना बसण्यासाठी बस स्थानकातील बसण्याच्या जागेवर तेथे भिकारी, गर्दुल्ले,दारुडे, बेवारस लोक बसलेले असतात.प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही.महामंडळाचे सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना ही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात.रात्रीच्या वेळी बस स्थानकात आली की शेड समोर उभी न करता समोरच उभी करतात.बस कोणती आहे हे पाहण्यासाठी प्रवाशी बस समोर गर्दी करतात व पुन्हा विखुरले जातात.प्रत्येक बस स्थानकात आल्यावर असे घडते.यामध्ये लहान मुले, महिला, वृध्दांना खूप त्रास होतो.महामंडळाने या स्थानकातील खाजगी वाहने, खाजगी दलाल, रिक्षा वाले, भिकारी, गर्दुल्ले दारुडे यावर नियंत्रण ठेवावे, वेड्या वाकड्या जागेत विभागलेल्या या बस स्थानकाचा राज्य परिवहन महामंडळाने कायापालट करावा व प्रवाशांची या त्रासातून मुक्तता करावी.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...