Skip to main content

Posts

*समीक्षण*. काव्य संग्रह:- कव्यमालाकवी:- धनजंय इंगळेपृष्ठ:- ६४किंमत:- ११० रुपयेप्रकाशन:- वारकरी प्रकाशनमुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारीप्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५

काव्य संग्रह:- कव्यमाला कवी:- धनजंय इंगळे पृष्ठ:- ६४ किंमत:- ११० रुपये प्रकाशन:- वारकरी प्रकाशन मुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारी प्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५           हातात पुस्तक पडताच त्याचा सुगंध मनाला मोहवून गेला.काव्याच्या एका एका पुष्पाने ही काव्यमाला अलगद शब्द रूपाने गुंफली गेली.शब्दमोती किती अनमोल असतात हे आपणास ठावूक आहेच.सोन्यापेक्षा ही याचे मोल अनमोल आहे.काव्यसंग्रहाच्या अंतरंगात एकूण ५२ कविता व मल पृष्ठावर एक अशा एकूण ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत.प्रत्येक काव्याचा ढंग हा आगळा वेगळा आहे.         काव्य संग्रहाला संपादक,गीतकार,साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.सुवर्ण अनुभवांची गुंफण म्हणजेच काव्यमाला..असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला.भवनाचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य असते असे माझे तरी म्हणणे आहे.एखादी भावना मनात उत्पन्न झाली की,ती काव्याच्या रूपाने अलगद प्रसूत होते...एक एक मोती अचूक हेरला आणि त्याला गुंफले जाते,तेव्हा आपलेच अपत्य आपल्याला कुरवळतांना किती आनंद होतो.स्व निर्मिती मनाला नवीन ऊर्जा देवून ...