Skip to main content

*समीक्षण*. काव्य संग्रह:- कव्यमालाकवी:- धनजंय इंगळेपृष्ठ:- ६४किंमत:- ११० रुपयेप्रकाशन:- वारकरी प्रकाशनमुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारीप्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५



काव्य संग्रह:- कव्यमाला
कवी:- धनजंय इंगळे
पृष्ठ:- ६४
किंमत:- ११० रुपये
प्रकाशन:- वारकरी प्रकाशन
मुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारी
प्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५

          हातात पुस्तक पडताच त्याचा सुगंध मनाला मोहवून गेला.काव्याच्या एका एका पुष्पाने ही काव्यमाला अलगद शब्द रूपाने गुंफली गेली.शब्दमोती किती अनमोल असतात हे आपणास ठावूक आहेच.सोन्यापेक्षा ही याचे मोल अनमोल आहे.काव्यसंग्रहाच्या अंतरंगात एकूण ५२ कविता व मल पृष्ठावर एक अशा एकूण ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत.प्रत्येक काव्याचा ढंग हा आगळा वेगळा आहे.
        काव्य संग्रहाला संपादक,गीतकार,साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.सुवर्ण अनुभवांची गुंफण म्हणजेच काव्यमाला..असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला.भवनाचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य असते असे माझे तरी म्हणणे आहे.एखादी भावना मनात उत्पन्न झाली की,ती काव्याच्या रूपाने अलगद प्रसूत होते...एक एक मोती अचूक हेरला आणि त्याला गुंफले जाते,तेव्हा आपलेच अपत्य आपल्याला कुरवळतांना किती आनंद होतो.स्व निर्मिती मनाला नवीन ऊर्जा देवून जाते.साहित्यिकांची ही ठेव असते,जगण्याची दिशा असते,नवी आशा असते,एक नवा उत्साह असतो,त्यात प्रेम,माया,ममता,जिव्हाळा,आपुलकी,माणुसकी ओतपोत भरलेली असते.अमोल हरिभाऊ जावळे सरांचे शुभेच्छा पत्र ही या काव्यसंग्रहास लाभले...हे आशीर्वाद ही लाख मोलाचे ठरले.
          दुनियादारी चित्रपट पाहतांना त्यातील ती घट्ट मैत्री आठवते.मैत्रीची दुनिया नामानिराळी असते.धनजंय सरांचा सर्व मित्र परिवार खूप अनोखा आहे.खूप जीवापाड प्रेम करणारे त्यांचे मित्र आहे....म्हणजे धनजंय सरच तितके प्रेमळ,निर्मळ आहेत..त्यामुळे त्यांच्या सहवासात येणारे प्रत्येक जण तितकेच प्रेमळ असणारच..यात शंकाच नाही.आपला एक मित्र कवी आहे,त्याच्या कविता हे सर्व जण नित्य वाचतात, ऐकतात... त्यामुळे त्यांच्या मनात इतका पवित्र,निर्मळ,सोज्वळ विचार येणे हे साहजिक आहे.आपल्या मित्राची चक्क या काव्यसंग्रहाची सारी पुस्तकेच त्यांनी छापली."मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा"....,ही ओळ आमच्या लाडक्या कवी मित्राची म्हणजे अनंत राऊत यांची आठवली. असा मित्र गोतावळा धनजंय सरांच्या आजूबाजूला आहे...हे ही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.सर्व मित्र परिवाराची नावे यात आलेली आहेत,तरी काही नावे राहिली असेल याची रुख रुखं ही त्यांच्या मनाला लागलेली आहे..या सर्वांना आम्हा साहित्यिक परिवाराकडून मनस्वी धन्यवाद.ही मैत्री एकाने नाही तर सर्व समूहाने जपली हे ही विशेष.तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.तुमचा पुस्तक प्रकाशन वेळेचा उत्साह ही अप्रतिम होता.माझी तब्बेत बरी असती तर मी ही या सोहळ्याला येणार होतेच,पण येता आले नाही.सरांनी प्रत्येकाचे तोंड भरून कौतुक केले.सारे दृश्य नजरेसमोरून गेले.अशीच मैत्री जपावी..हा मोलाचा उपदेश यातून मिळतो.
       या पुस्तकाचे रुप माझ्यासमोर खुले झाले हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते.तत्परता यातून जाणवली.राहुल मुंढे सरांनी हे मित्र प्रेम जाणून वेळेत संग्रह छापून दिला या बद्दल सरांचे मनापासून धन्यवाद.यातील प्रत्येक काव्य मनाला  स्फुरण देते.धनजंय सरांचे मनोगत ही अतिशय सुंदर आहे.भावपूर्ण शब्दांचा खजिना रिता केला त्यांनी.या काव्य संग्रहाचा सर्वांनी माझ्या प्रमाणे आस्वाद घ्यावा.धनजंय सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस मनस्वी मोरपंखी शुभेच्छा देते.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण,पुणे- 411044
शिक्षिका,लेखिका,कवयित्री,निवेदिका
मो.न.8830654661/ 9405042938

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...