Skip to main content

*ग्रामीण कवी श्रीराम घडे यांचे रुमणं हा काव्य संग्रह प्रकाशित*


राणीसावरगाव येथील ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्षाची व्यथा मांडणाऱ्या कविताचा समूह असलेला रूमणं हा कविता संग्रहाचे प्रकाशन पाठयपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे व काव्यवाणी काव्यसंस्था पुणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजयुवा प्रकाशन पुणे यांनी अप्रतिम काव्यसंग्रह केला आहे आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ मा नंदू वानखडे सर यांनी स्वतःच्या हाताने चित्र काढून माझ्या काव्यसंग्रहाची शोभा  त्यांचे गौरव पुंडे सर मनःपूर्वक आभार .या नंतर *महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार, कथा निवेदक, लेखक तथा पाठयपुस्तक कवी श्री हनुमंत चांदगुडे यांचा श्री संगमेश्वर बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 2024 चा महाराष्ट्र भूषण साहित्य गौरव पुरस्कार शॉल श्रीफळ,सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला*,या नंतर कवी हनुमंत चांदगुडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या करिअर बद्दल मार्गदर्शन केले व साहित्याची आवड असणारा विद्यार्थी स्वकर्तृत्वावर यशाची गरुड भरारी घेऊ शकतो असे सांगून त्यानीं लिहलेल्या इयत्ता आठवीतील अळाशी कवितेचा भावर्थ सांगताना म्हणाले की,लेकराला मोठं अधिकारी बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याला शिकवण्यासाठी अत्यन्त हालाकीच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या कष्टकरी बापाला शाळेची परीक्षा फीस भरायला पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करावी लागते या प्रसंगाच वर्णन करताना उपस्थित सर्व विद्यार्थी पालकांच्या डोळ्यातून अश्रूचे बांध फुटत होते.सर्व वातावरण भावनिक झाले होते, उपस्थित सर्व पालक व विद्यार्थी येवढया मोठ्या उंचीच्या पाठयपुस्तक कविला राणीसावरगाव मध्ये आणल्याबद्दल शाळेचेही कौतुक करीत होते. कवी चांदगुडे यांच्या मार्गदर्शनानंतर पुणे येथील निमंत्रीत कवी,कवयत्री सौ,वाणी मॅडम,प्रमोद घोरपडे(कांतासुत) ऐश्वर्या नेहे, चैतन्य काळे, गौरव पुंडे,योगेश हरणे, अक्षय तेलोरे यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज  विद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय या शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या . कविता कशी लिहावी यांचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले तर कोल्हापूर येथील कवी लेखक सागर पाटील यांनी उत्कृष्ठ असे एकपात्री नाटीकेचे सादरीकरन केले, *या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छत्रपती विद्यालयाचे सचिव श्री शिवसांब कोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे सहशिक्षक श्री डालपे सर व उत्कृष्ट सूत्रसंचालक शिवव्याख्याते फेम कवी शिवशंकर डोईजड सर, संस्थेचे संचालक मारोती अप्पा कोरे, मा.सरपंच विद्यासागर घडे, तुकाराम दादा हाके,तसेच दिलीप मुंडे, फेरोज शेख सर, गोविंद जाधव सर हे होते*, या कार्यमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री गणाचार्य मॅडम व उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री व्यंकट कदम सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली, या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन श्री केशव हाके सर यांनी केले तर आभार सौ. तापडिया मॅडम यांनी केले, शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांना जेवणाची सोय केली व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...