Skip to main content

पुणे येथे सकल धनगर समाजाच्या राज्य व्यापी अधिवेशनाचे आयोजन

.
शनिवार दिनांक १० आगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे येथे सकल धनगर समाजाच्या राज्य व्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतीक भवन,गंज पेठ पुणे या ठिकाणी " एकच नारा, धनगर सारा"," लढा एसटी प्रमाण पत्र मिळेपर्यंत" ," ना नेता,ना पक्ष आता एसटी आरक्षण हेच लक्ष" ," देऊ आता एक नारा,करु धनगर एक सारा" ," काम जुने च पण नव्या दमाने करायचे", आदी गोष्टी वर विचार विनिमय करून पुढचे ठोस पाऊल उचलण्यासाठी सकल धनगर समाज राज्य व्यापी अधिवेशन भरविते आहे.या राज्य व्यापी अधिवेशनात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.धनगर समाजाने आजपर्यंत एसटी आरक्षण साठी खूप च संघर्ष केला आहे.अजूनपर्यंत यश मिळाले नाही, परंतु आता मात्र जुने काम (एसटी आरक्षणचे) नव्या दमाने करायचे, असे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी ठरविले आहे.
 भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मोबाईल नंबर 8652305700

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...