महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे - संपादक नितीन गायके
नेवासा प्रतिनिधी:- वाकडी ता. नेवासा जि. अहमदनगर येथे साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री. माननीय विठ्ठलराव लंघे पाटील, श्री. निलेश सरोदे, दैनिक साहित्य सेवा संपादक श्री.नितीन गायके, ज्येष्ठ साहित्यिक श्री. सायमन भारस्कर,श्री कचरू गाढे, श्री. अंकुश काळे वाकडी गावचे सरपंच संभाजी काळे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नितीन गायके सर यांच्या परखड भाषाशैलीने झाली. ज्यांनी समाजासाठी लढा दिला आपले जीवन समाजासाठी खर्च केले या महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे. क्रांतिकारक बदल झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी निर्मित केलेले साहित्य वाचावे. तसेच या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करा परंतू त्याआगोदर प्रथम त्यांचा अभ्यास करा व आपल्या वर्तनात बदल आणा. त्यांचे विचार समाजात पेरा तरच आपण जयंती पुण्यतिथी साजरी करून आदरांजली वाहिली असे म्हणता येईल. साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे हे साहित्यिक सर्व जाती धर्माचे होते,मानवता हाच त्यांचा धर्म असे विचार श्री नितीन गायके सर यांनी मांडले व मान्यवरांची, श्रोत्यांची मने जिंकली.
श्री. मुकुंद भगत यांनी साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांचे विचार पटवून दिले.
ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर यांनी साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांचा जीवन परिचय आपल्या मधुर शब्दात सांगितला.
भाजपा जिल्हाध्यक्ष मा. विठ्ठलरावभाऊ लंघे यांनी आपले मार्मिक विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग मोहन काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. नामदेव वडागळे
श्री. भगवान वडागळे श्री. मारुती वडागळे श्री. आकाश वडागळे श्री. अनिल शिरसाठ यांनी केले.
Comments
Post a Comment