पिठोरी श्रावण अमावस्येला
आला सण बैल पोळा ,
बैल पोळा सण साजरा करण्यास
गाव सारा झाला गोळा. ॥१॥
नदीवर पहाटेस
घालून मनसोक्त आंघोळ ,
अन गळ्यात घालू घुंगर माळ
शिंगे रंगवून बाशिंग बांधून लडिवाळ. ॥२॥
मखमलीच्या झुलीनी
सर्जा राजा सजले भारी ,
पंचारतिचे ताट घेऊन बळीराजाची
कारभारीन स्वागत करी .॥३॥
गोड पुरण पोळीचा
नैवेद्य खाऊ घाली प्रेमाने,
सर्जा राजा जाई आनंदुन
डोळ्यात येई अश्रू दाटून .॥४॥
वर्षभर शेतात बळीराजा
सोबत सर्जा राजा राबतोय दिन रात ,
म्हणून बळीराजाचे कुटुंब
सुखाचे दोन घास खाई आनंदात .॥५॥
श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर
कामोठे, नवी मुंबई
तालुका: पनवेल
जिल्हा: रायगड
भ्रमणध्वनी क्रमांक: 8108469635
Comments
Post a Comment