*उरण- बोकड वीरा येथील श्री भ. पो. म्हात्रे. (गुरुजी) यांच्या निवासस्थानी गणपती निमित्त १०/०९/२०२४ रोजी निमंत्रित कवींच्या कवी संमेलनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास माननीय- मारुती सिंधू बागडे. (कर्जत), हरिश्चंद्र माळी (चिर्ले-उरण), गज आनन म्हात्रे. (करावे- नवी मुंबई), राम म्हात्रे. (उरण), सुचित्रा कुंचमवार. (नेरूळ- नवी मुंबई), अरुण द. म्हात्रे. (जासई- उरण), अनिल मुनघाटे. (नवी मुंबई), अशोक कुंचमवार (नेरूळ- नवी मुंबई) आणि भ. पो. म्हात्रे. उपस्थित होते.*
*सुपरिचित कवी गायक- मा. अरुण द. म्हात्रे. यांच्या मधुर आवाजात गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दोन कवींच्या कविता आणि कवी/गायक- अरुण द. म्हात्रे. व भ.पो. म्हात्रे गुरुजी यांची सून गायिका- सौ. सोनाली म्हात्रे. यांचे सुमधुर गीत गायन अशा क्रमाने पहिली फेरी पूर्ण झाली. तदनंतर चहा- पाणी- नाश्ता- गप्पागोष्टी करून दुसऱ्या फेरीस सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीस बासरी वादक- अरुण द. म्हात्रे. यांनी बासरीवर तीन/चार भक्ती गीते वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आणि पहिल्या फेरीप्रमाणेच दुसरी फेरी पूर्ण झाली. श्री. भ.पो. म्हात्रे गुरुजी आणि परिवार यांनी सर्व उपस्थितांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन आदराने सत्कार केला. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मा. सुचित्रा कुंचमवार यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. भ. पो. म्हात्रे गुरुजी व अरुण द. म्हात्रे. यांनी आखीव - रेखीव केले. शेवटी अरुण द. म्हात्रे यांच्या सुमधुर भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे गणेशाच्या कृपाशीर्वादाने सदर कवी संमेलन आणि कार्यक्रम एक वेगळा आनंद देऊन गेला.*
Comments
Post a Comment