Skip to main content

राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव स्वागताध्यक्षपदी गणेश घुगे

कन्नड: ( प्रतिनिधी ) त्रैमासिक तिफण व भाषा साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्या वतीने श्रीक्षेत्र भगवानगड मेहगाव ता. कन्नड येथे आयोजित सातव्या तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष पदी साहित्यप्रेमी, युवानेते गणेश घुगे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नवोदित कवी, साहित्यिक, लोककलावंत यांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळून प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत कन्नड तालुक्यातील वाकी, हतनूर, बहिरगाव, कन्नड, तेलवाडी आदी ग्रामीण भागांत तिफण कविता महोत्सव घेण्यात आले आहेत. 
तसेच दरवर्षी तालुक्यातील जेष्ठ साहित्यिकांना तिफण साहित्य सन्मान देऊण गौरविण्यात येते. या वर्षी पासून राज्यस्तरीय तीन साहित्य, कविंना ही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 2025 मध्ये आयोजित राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव नियोजनार्थ दि. 10 आक्टोंबर रोजी शिवाजी महाविद्यालय कन्नड येथे प्राचार्य डॉ. विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड कृष्णा पाटील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत ॲड कृष्णा पाटील जाधव, प्रा. रंगनाथ लहाणे, कविता महोत्सवाचे संयोजक तिफणकार डॉ. शिवाजी हुसे यांनी मार्गदर्शन केले. 
बैठकीत श्री क्षेत्र भगवान गड मेहगाव ता. कन्नड येथे कविता महोत्सव आयोजित करणे, तसेच स्वागताध्यक्ष पदी गणेश घुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गणेश घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी , डॉ. रामचंद्र झाडे,भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद कन्नड शाखे चे कार्याध्यक्ष संदिप ढाकणे, अध्यक्ष प्रविण दाभाडे, सचिव अरुण थोरात, कवियत्री शुभदा देवरे, अनिता राठोड, श्रीराम दापके, सुरेश औटे, लक्ष्मण वाल्डे, संदिप वाकडे, शिवनाथ गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...