Skip to main content

अभिप्राय. दिवाळी अंक - प्रवरेचे पाणी

आजही पूर्वीचे दिवाळीचे दिवस आठवतात...दिवाळीची स्वच्छता,फराळ बनविणे,कपडे,रांगोळी,दिवे,आकाश कंदील,माळा,फटाके खरेदी,घर रंगवणे,सजवणे इत्यादी कामे चालू असताना दिवाळी अंक वाचनाची खूप ओढ लागलेली असायची.वडील कधी दिवाळी अंक खरेदी करून आणतील आणि तो आपल्याला वाचायला मिळेल तो उत्साहच अदभुत होता.तोच उत्साह अजून ही आपल्या चेहऱ्यावर दिसतो,वागण्यातून जाणवतो,तीच धडपड,तोच अट्टाहास,अन् त्याच्या सोबत आता आपलेही लेखन सर्वांनी वाचावे यासाठीची उर्मी,त्यासाठी आपल्या मनातील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्याचे सर्वांनी कौतुक करणे,आपल्या कौतुकाने आई वडिलांच्या ,नातलगांच्या - मित्र मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद, आपल्याला प्रेरणा देतो,हेच दिवाळी अंकाचे प्रचंड यश.
          "प्रवरेचे पाणी" दिवाळी अंक हाती पडला अन् त्यावरील मुखपृष्ठ पाहून मन हेलावून गेले.किती सुंदर,अचूक मुखपृष्ठ आहे...ज्यांनी आपले संपूर्ण जीवन नेहमी इतरांना मदत करण्यात घालविले,आपल्या भारताचे अनमोल रत्न रतनजी टाटा.सरस्वती सोबत लक्ष्मीची कायम कृपा दृष्टी त्यांच्यावर होती.पण,नित्य विनम्र भाव त्यांच्या सात्विक चेहऱ्यावर असायचा.अशी थोर व्यक्तिची प्रतिमा आपल्या अंकाच्या मुख पृष्ठावर येण्याने अंकाची उंची खुप उंचावर पोहचली असे मला वाटते.चेहऱ्यावरील स्मित हास्य,डोळ्यातील तेज,प्रसन्न चेहरा खुप काही सांगून जातो.मनापासून मुख पृष्ठ ने मनात घर केले.मनापासून संपादकांचे आभार इतक्या उच्च विचाराने आपण मुखपृष्ठ घेतले.मुख पृष्ठची निवड हे खूप महत्त्वाचे कार्य असते,ते आपण अचूक केले.सर्वांच्या घरात अंक पोहचताच प्रत्येकाला नक्कीच आनंद होणार हा विश्वास आहे.रतन टाटा प्रत्येकाला होता येणार नाही पण,त्यांचे थोडे जरी विचार अंगीकारले तर आपली प्रगती ही निश्चित होणार.देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने नक्कीच होणार.ज्यांचे विचार प्रगल्भ ते नक्कीच काही ना काही उत्तम कार्य करून जाते.रतन जी टाटा यांच्या विचाराने चालण्याची आज देशाला गरज आहे.
         "First impression is last impression". सर्वांना माहिती...डोळ्यांच्या नजरेत एखादी वस्तू आवडली की ती मनात खोलवर घर करून बसते.आपल्या अंकाची  क्वालिटी अंक हातात आल्या आल्या समजते.वापरलेला कागद,अक्षर टाईप,फाँट सर्व अचूक.त्यासोबत घेतलेली प्रसंगरुपी चित्रे अंकाची उंची गाठते.आपला बोलका असा अंक झालेला आहे.लेख,कविता,कथा माध्यमातून प्रत्येक साहित्य वाचक रसिकाच्या मनात घर करते.कोठे तरी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतांना जाणवतो,तो जर थांबवायचा असेल तर या व अशा उच्च माध्यमातून व्यक्तींना वाचक प्रिय बनवून ठेवणे गरजेचे आहे."वाचाल तर वाचाल" हे जेव्हा समजेल तेव्हा मानव नक्कीच वाचनाकडे वळेल.पण,तो पर्यंत वेळ गेलेली नसावी.वेळ खूप महत्त्वाची गोष्ट आहे,काही गोष्टी वेळेतच घडल्या पाहिजेत.आपल्या प्रत्येक साहित्यिकांची जबाबदारी आहे,आपण उत्तम साहित्य निर्माण करावे आणि ते वाचकांपर्यंत पोहचावे.प्रत्येक ठिकाणी मक्तेदारी दिसून येते हे चित्र बदलले पाहिजे.ज्याचे एकदा साहित्य क्षेत्रात नाव झालेले आहे त्यांनाच डोक्यावर उचलून घेतले जाते पण इतर उत्तम साहित्यिक असून ही दुर्लक्षिले जातात.कधी कधी जाणून बुजून तर कधी लक्षात न आल्याने.तंत्रज्ञान ने कितीही प्रगती करू द्या,पण पुस्तक वाचल्याने जो आनंद मिळतो तो पैशाने विकत घेता येत नाही.तो आतील आनंद असतो,त्याला कशाचीच उपमा देता येतं नाही की,त्याची कोणत्या गोष्टींशी तुलना करता येते.एक पाऊल प्रगतीकडे टाकायचे असेल तर वाचन संस्कृती बलाढ्य करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.कोणतीही गरज वेळेत पूर्ण केली तरच त्याचा उपयोग होत नाही.
        आपला सुंदर,तेजस्वी,रस पूर्ण,अभ्यास पूर्ण अंक वाचायला सुरुवात करायला घेतली अन् पान नंबर दोन वरील कार्यकारी संपादक मंडळात माझे नाव वाचून मनस्वी आनंद झाला.खूप मोठा विश्वास माननीय श्री. संजय नवले सरांनी माझ्यावर ठेवला,याचे मनापासून आभार व्यक्त करते.त्यास पात्र ठरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न मी करेल.सह संपादक म्हणून खूप मोठी जबाबदारी आपण मला दिली.आपल्या विश्वासाला पात्र उतरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न मी करेल.लेखी अभिप्राय देण्यास जरा विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.या संसार चक्रात आई म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत होते,शिक्षक म्हणून माझे कार्य चालू होते अन् राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान चे बी.एल.ओ. चे कार्य चालू होते.आज ते पूर्ण होताच लेखनाला सुरुवात केली.मुलीला आपल्या अहिल्यानागर येथील Y.C.M.Dental College येथे प्रवेश घेतला, तिला हॉस्टेल मध्ये सोडवायला जावे लागले.अन् नंतर शाळा सांभाळून BLO ची कामे,आणि त्यात सर्दी,खोकला,ताप यांनी मध्येच डोके वर काढले.मग काय तारेवरची कसरत चालू होती.प्रत्येकाच्या मागे धावपळ असते,त्यात काय इतके.संपूर्ण पुस्तक वाचले,तेव्हाच लिखाणाला सुरुवात करायला घेतली.कारण,साहित्य हे आजच्या वाचक वर्गासाठी आवश्यक असे म्हणजे सामाजिक भान ठेवून केलेले होते.अनेक समस्यांना वाटा फोडून देणारे साहित्य आहे.प्रत्येक लेख,कथा,काव्य यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो,विचार करण्यास मानव नक्की तयार होतो.स्वतः मध्ये डोकवायला लागतो,जो स्वतः स ओळखतो तो संपूर्ण जग ओळखू शकतो,असे मला तरी वाटते.लेखनाची खोली खूप वैचारिक आहे.प्रत्येकाने लेखनाला न्याय दिला आहे.या सोबत सामाजिक जबाबदारी उचलली आहे.वाचनाने काही गोष्टीत आपण न बोलताही खूप काही बदल करू शकतो.जी ताकद शब्दात असते ती तलवार, चाकुत नसते.शब्दांचे वार खूप अचूक बसतात.शब्द बोलके असतात,त्यांना धार असते,वजन असते.प्रत्येकाच्या अवतीभवती,घरात बऱ्याच अशा घटना घडत असतात त्यांच्या वर विचार विनिमय होणे गरजेचे असते,शिवाय त्यातून अचूक तोडगा काढणे गरजेचे असते.बदलायची गरज आहे,आणि हा बदल प्रत्येकाने स्वीकारावा.प्रत्येकाला जगण्याचा ,आनंद घेण्याचा अधिकार आहे तो त्यांना घेवू द्यावा.चर्चा करणे आणि आपले जीवन त्यात व्यर्थ घालवून काही उपयोग नाही.बदल हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे.त्याला सामोरे जाणे,स्वीकारणे गरजेचे आहे.आणि हे जेव्हा समजते किंवा ही ताकद साहित्यात आहे.
     सरांचे संपादकीय मनोगत अतिशय अभ्यासपूर्ण असे आहे.ते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजावते.प्रेम ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे.ते ओळखता आले पाहिजे,देता आले पाहिजे,त्याला जपता आले पाहिजे.जेथे प्रेम आहे तेथे सर्व आहे.प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे.त्यासाठी दिलेली उदाहरणे खूप काही सांगून जातात.समाधान रुपी औषध प्रत्येकाजवळ असेल तर कोणी आजारी पडणार नाही.माणसाने माणुसकी जपली तरच माणूस म्हणून घेण्यास लायक असु.माणसातली माणुसकी जो पर्यंत जिवंत आहे,तो पर्यंत माणूस म्हणून घेण्यास आपण लायक आहोत.ती जेव्हा समजेल तेव्हा आपली तुलना साधी जनावरांशी ही करता येणार नाही.कारण त्यांच्यात ही ती टिकून आहे.
      या सजीव सृष्टीत आपण पाहुणा कलाकार म्हणून आलेलो आहोत.खाली हाताने आलो,अन् खाली हातानेच आपल्याला जायचे आहे.पण,आहे ते जीवन आनंद देत व घेत जगायचे आहे.देण्यात जे सुख असते ते घेण्यात किंवा लुबडण्यात नसते,हे कायम लक्षात ठेवावे.जीवन एकदाच मिळते त्याचा सदुपयोग करावा.पैशामागे धावण्यात काहीच अर्थ नाही,कारण तो आज आहे तर उद्या नसणार.मन नित्य शुद्ध,पवित्र ठेवावे.संतांची शिकवण खूप गरजेची झालेली आहे."जेथे प्रेम,द्या,शांती तेथे देवाची वस्ती",हे कायम लक्षात घेवून जीवन वाटचाल करावी."जे पेराल ते उगवेल" हे कायम ध्यानी ठेवावे.मनुष्य सृष्टीत येतांना रडत येतो अन् जातांना इतरांना रडवून जातो."प्रेमाशिवाय सारे व्यर्थ".म्हणून "प्रेम द्या अन् प्रेम घ्या".असा मोलाचा संदेश आपल्याला न कळत देतात.
     ऋण निर्देश,भावपूर्ण श्रद्धांजली मनाची उंची सांगते.स्वतः जगत असतांना इतरांना विसरू नये.हातात हात घालून वाटचाल करायची आहे.खूप छान.प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आहेत.साहित्याची गुंफण अचूक अशी केलेली आहे.लेख माला,काव्य माला अचूक गुंफल्या आहेत.वाचकांच्या मनाचा ठाव घेण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो.मध्ये मध्ये विचारांची गुंफण ही अचूक केलेली आहे.सहजीवन पासून सुरू होणारा संपूर्ण जीवन प्रवास रेखाटला आहे.नात्याला वेळ दिला पाहिजे,त्याला समजून घेतले पाहिजे,तरच ते टिकते,फुलते,बहरते.
       अशा नाना छटांनी,विचारांनी,गंधाने अंक सजला आहे,बहरला आहे.त्याचा गंध सर्वदूर पसरला आहे.मनापासून संपादक व संपादक मंडळ यांचे मनापासून हार्दिक -हार्दिक आभार मानते.या सामाजिक कार्यात आपल्या सर्वांसोबत मलाही कार्य करता येईल,माझाही खारीचा वाटा असेल याची ग्वाही देते. 
 
"विचारांनी घेवून भरारी
करूया  जीवन करारी".

आपलीच,
सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,411044
मेल आय.डी.:- pratimakale29@ gmail.com
मो.न.8830654661 /9405042938

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...