वेड मन...
माझं वेडंच आहे रे मन सख्या !
आवडतं कधीतरी मनासारखं वागायला
कारण तू आहेस ना मला सांभाळायला....
मनासारखे वागायचे ठरवते जरी
वाटते आहे रे या भिती जगाची
कारण लोकं असतात मागे बोलायला....
चूका होतात न, कधी अनावधानाने
कोणी आपल्या चुका पोटात नाही घालत
मग तूच तर आहेस मला सांभाळून घ्यायला....
हो वागते मी लहान मूलीसारखी
मुलात मुल होऊन
आवडते मला त्यांच्यासारखे वागायला
आहेस की तू मी चुकले तर क्षमा करुन मन जपायला..!
आवडते मला वृद्धांची सेवा करायला
त्यांना गोष्टी सांगून त्यांचे मन रमवायला
आहेस तू मला तिथे घेऊन जायला...
पावलोपावली काटे जरी असले तरी
काट्यातनं वाट काढायला लावणारा सखा
आहेस सखा तू सोबतीला ... तू सोबतीला...
*वसुधा वैभव नाईक*
Comments
Post a Comment