Skip to main content

शीर्षक :- स्री मध्ये असते शक्ती अपार.


इतिहास आहे साक्षीदार
रणरागिणीने शत्रू तुडवला
शूर राणी लक्ष्मीबाईंनीच
झाशीचा किल्ला लढवला...

       मानवी प्राण्यात दोन प्रमुख जाती,त्या म्हणजे स्री व पुरुष.दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण.मानवी जीवन जर आपल्याला पृथ्वीतलावर हवे असेल तर या दोन्ही जाती टिकल्या पाहिजे,बहरल्या, फुलल्या पाहिजे.जीवन म्हणजे रथ आणि रथाची ही दोन्ही भक्कम चाके.जीवन सुरळीत,सुरक्षित चालण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित,सुरक्षित,समानतेने चालली गेली पाहिजे.त्यासाठी महिला शिक्षितe होणे गरजेचे आहे."मेणाहून मऊ व वज्राहून कठीण महिला आहे".ती एकाच वेळी असंख्य कामे करत असते. "शिकलेली आई घरादाराला पुढे नेई ",असे, त्यामुळेच तर म्हटले जाते.सामर्थ्य,मातृत्व,दातृत्व,नेतृत्व,श्रद्धा,प्रेम, माया,शील,सहनशीलता,सेवा,समाशिलता इत्यादी गुणांचा तीe संपन्नशिल,वैभवशाली ठेवा,खजिना आहे.

वार नाही तलवार आहे...
ती समशेरची धार आहे...
ती सबला नार आहे...
ती धगधगता अंगार आहे...
ती सृजनशील विचार आहे...
ती प्रगतीचा उंच आलेख आहे...
ती विश्वाची जननी आहे..3

           इतिहासातही डोकावून पाहिले तर अनेक कर्तृत्ववान महिलांची चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतील.पण,पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांची नावे आपल्या समोर आली नाही,त्यांना कायम  दुर्लक्षिले गेले.अनेक विभूती होवून गेल्या,त्यांनी प्रत्यक्ष रणांगण ही गाजवले."चूल व मूल" पुरतेच तिचे जीवन नंतर कायम ठेवले.घराबाहेर पडण्यास,शिक्षण घेण्यास,तिला बंदी घातली गेली तरी ती या बंधनाच्या चौकटी बाहेर आली आणि स्वतःला सिद्ध करून तिने दाखविले,ती कोणत्याच क्षेत्रात कमी नाही.रामायण,महाभारत,कृष्ण कथा सांगून अचूक संस्कार बाल शिवाजी वर करणाऱ्या,त्यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ याच होत्या.पुण्य श्लोक अहिल्यामाता यांचे कार्य पाहिले तर आपल्या लक्षात येईल त्या काळात शब्दाला जागणाऱ्या माता होत्या.त्यांनी किती तरी मंदिरे,घाट बांधली,मंदिरांचा जीर्णोद्धार केला तो ही स्वतःच्या संपत्तीतून.किती तरी कुटुंबांच्या सदस्यांच्या अकाली मृत्युला त्यांना सामोरे जावे लागले पण,त्या डगमगल्या नाहीत मोठ्या जिद्दीने त्यांनी राज्यकारभार केला आणि प्रजाहिताची कामेe केली.झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या लहान लेकराला घेवून शेवटच्या क्षणापर्यंत लढली,पण इंग्रजांना शरण आली नाही.राणी दुर्गावती अभ्यासा,तिने पती निधनानंतर शहेनशहा अकबराला करारी झुंज दिली.हे आणि असे किती तरी चरित्र अभ्यासने महत्त्वाचे आहे.

नारी तूच सावित्री
नारी तूच जिजाऊ
नारी तूच अहिल्या
नारी तूच रमाई....

          पूर्वीच्या कर्मठ सामाजिक वातावरणात वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर होणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर हा मान मिळविणाऱ्या आनंदीबाई गोपाळ जोशी,पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,त्यांना मदत करणाऱ्या फातिमा शेख,कुष्ठरोग्यांच्या मदतीला धावणाऱ्या त्यांची सेवा करणाऱ्या साधना आमटे,भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अन् ते प्रत्यक्षात पूर्ण करणारी भारताची पहिली महिला अंताळवीर कल्पना चावला,भारताची वंशज सुनिता विल्यम्स जी आता ही अंतराळात आहे.या सर्व महिलांचा अभ्यास केल्यावर समजेल त्यांचे ध्येय किती उच्च होते..आणि त्यामागे त्यांचा अभ्यास,चिकाटी,मेहनत,जिद्द लक्षात येईल.

स्री मध्ये असते शक्ती अपार, 
तीच आहे या सृष्टीचा आधार...
करू नका तिचा तुम्ही व्यापार,
नाही तर माजेल सर्वत्र हाहाकार...

            महिलांचे कर्तृत्व पाहिले तर अभिमानाने आपल्या प्रत्येकाची मान उंचावेल.आताच चांद्रयान 3 ची यशस्वी झेप महिला टीम नेच घेतली होती.त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली तर त्या ती पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात,अन् ते काम तडीस नेतात हे प्रत्येक महिलांचे वैशिष्ट्य आहे.आताच्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किती बिकट परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यांनी राष्ट्रपती पद भूषविले हे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे.

ती आहे म्हणून,
सारे विश्व आहे...
ती आहे म्हणून,
घराला घरपण आहे...
ती आहे म्हणून,स
नाती टिकून आहे...

         जेथे महिलांचा सन्मान होतो,तेथे शांती,समाधान,प्रेम,ऐश्वर्य  निवास करते.निसर्गाने महिलांना एक अदभुत शक्ती दिली आहे...जिच्या वापराने ती अनेक अशक्य कामे सहज,अचूक,पटकन करून दाखवते.ती प्रेमाचे एक उदाहरण आहे.प्रेमाने विश्व जिंकता येते.ज्या घरात तिचा सन्मान होतो त्या घराचा विकास होण्यास वेळ लागत नाही.

ती आई आहे,ती ताई आहे
ती मुलगी आहे,ती मैत्रीण आहे
ती पत्नी आहे,ती सून आहे
ती सासू आहे,ती आजी आहे
पण,या आधी ती एक स्री आहे,
एक सजीव आहे,जिला मन आहे,
तिचा आम्हां सर्वांना अभिमान आहे...

        आपल्या घरातील आजी,आई, बहिण,पत्नी यांचेच उदाहरण पहा ना...त्यांचे कार्य पहा..मग लक्षात येईल त्यांची कार्य करण्याची खोली,त्यांचा विचार,त्यांची जिद्द,त्यांचे कर्तृत्व.म्हणून या प्रत्येक भगिनीचा सन्मान होणे गरजेचे आहे.आपली पिढी घडवायची असेल तर तिला तिच्या पंखात बळ भरू द्या,उंच भरारी घेवू द्या.त्याला आकाश मोकळे राहू द्या,बंधनांचे ओझे बाजूला करा.संधी द्या,नक्कीच ती त्या  "संधीचे सोने करेल". आपल्या शिक्षिका,आई,आजी यांना आपल्या डोळ्यासमोर आणा ,त्यांची कार्ये आठवा एकाच वेळी किती कार्ये त्या करत असतात.त्यांच्या विचारांची खोली प्रचंड आहे.त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करू द्या.

लक्षात घ्यावे  मानवांनो
नव्हती कधी ती अबला 
कर्तृत्व  सिद्ध  करुनिया
वावरते जीवनात सबला...

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...