Skip to main content

*आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न*


पुणे(प्रतिनिधी): मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास, संवर्धन व्हावे, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृ‌भाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते. त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन. नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे. आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.डॉ.मोहन कांबळे, प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे यांनी भूषविले. मा.डॉ. वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मा.प्रज्ञा देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्या सुमधूर स्वरात ईशस्तवन  सादर केले. सर्व वातावरण मंगलमय झाले. मा.वंदना आणेकर, मुख्याध्यापिका, अभिनय वि‌द्यालय हायस्कूल, कर्वेरोड, पुणे- उपसचिव, मातृभाषा अध्यापक संस्था यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मंगला निफाडकर  सहकोषाध्यक्ष मातृभाषा अध्यापक संस्था ,पुणे यांनी, संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. मा.डॉ.मोहन कांबळे यांनी व्यक्तीमत्व विकासात नाटयवाचनाचे महत्त्व विषद केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. असे अनेक उपक्रम मराठी भाषेत शालेय स्तरावर होणे आवश्यक आहे. अशा उप‌क्र‌मामधूनच भावी उत्तम  कलाकार निर्माण होणार आहेत असे विचार त्यांनी व्यक्त केले. मा.वृषाली खिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे कार्य कसे चालते. शालेय वयापासून रोटरी क्लब‌च्या कार्याला कसे जोडून रहायचे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील उत्साहाचे त्यांनी कौतुक केले व नाटयवाचनात सहभागी  संघांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सल्लागार मा.हेमंत कुबडे, मा.घोरपडे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. मातृभाषा संस्थेच्या अध्यक्षा मा.स्मिता ओव्हाळ यांनी शुभेच्छा संदेशामार्फत संवाद साधला. मा.वृषाली दातार - सदस्य रोटरी क्लब, पर्वती. मा.पुष्पलता लाड - सेवानिवृत्त शिक्षिका रेणुका स्वरूप विद्यालय, सदाशिव पेठ ,पुणे.  मा. अमर कोटबागी - निवृत्त ऑफिसर, नाट्याविषयीची आवड जोपासणारे रोटरी क्लब सदस्य. मा. शोभा कमलाकर निवृत्त मुख्याध्यापिका - एस.एम जोशी, हिंदी माध्यमिक विद्यालय , पुलगेट, पुणे. यांनी परीक्षक म्हणून कामगिरी स्वीकारली. मातृभाषा अध्यापक संस्था सचिव मा.संध्या माने, कोषाध्यक्ष निमल गीताभारती, सहकोषाध्यक्ष मा.मंगल निफाडकर, कार्याध्यक मा.शामला पंडित (दीक्षित ), संचालिका मा.सुरेखा सोनवणे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यास विशेष सहकार्य लाभले. पूर्ण कार्यक्रमाचे सुसंबद्ध असे सूत्रसंचलन संस्थेच्या कार्याध्यक्षा मा.सुरेखा लेंभे यांनी केले तसेच सौ.शारदा पानगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-- प्रदीप बडदे, (नवी मुंबई)

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...