Skip to main content

*मला भेटलेले व्यक्तिमत्त्व...*



        म्हणतात ना सर्व भेटी या आधीच ठरलेल्या असतात..त्या जीवनात जेव्हा होणार असतात तेव्हा च होतात. कोरोना काळात आपण स्वतः ला वेळ द्यायला लागलो....म्हणजे माझ्या दृष्टीने स्वतःला गुंतून ठेवू लागलो.आहे तो दिवस आनंदातच घालवायचा ...समोर कितीही कठीण प्रश्न आले तरी.जीवन एकदाच मिळते... हे सर्वांना माहिती.आपल्यातील कलागुण याच काळात आपण मानसोक्त पण पूर्ण करू लागलो.आणि लिखाणाकडे अलगद मी वळले गेले.जो माझ्या जगण्याचा एक सच्चा मार्ग बनला.याच मार्गाने जाताना खुप अफलातून व्यक्तींना भेटले.....त्यांचे विचार समजून घेतले..त्यांना जाणले..त्यांना कवितेतून,कथेतून,लेखातून,भाषणातून ...म्हणजे साहित्यातून समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला.या व्यक्तींच्या अंतर्मनात जाण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला.
           यातील किंवा यापेक्षाही वेगळे व्यक्तिमत्त्व भावले मनाला ते म्हणजे माननीय सदाफुले सर तुम्ही.तुम्हाला साहित्य ,साजिक स्तरातील सर्वच जण मामा,मास्तर म्हणतात... आणि याच नावाने आवाजही देतात.माझ्या साहित्यिक मित्र परिवाराकडूनही तुमचे नाव नेहमी ऐकले होते...पण,इतक्या वर्षे तुम्हाला भेटण्याचा योग आला नाही.आणि इतक्या वर्षाने तुम्हाला भेटण्याचा तो योग साने चौक येथील माननीय वाघमोडे सरांच्या विश्वरत्न इंग्लिश विद्यालयमध्ये काव्यात्मा साहित्य परिषद आयोजित आत्माराम हारे सरांच्या काव्यसंमेलन आला. कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे तुम्ही पुढील कार्यक्रम साठी लवकर निघून गेलात .त्यामुळे तुमच्या सोबत बोलणे झालेच नाही.फक्त दीप प्रज्वलन साठी आपण सोबत होतो.त्या दिवशीही तुम्ही माझी कविता ऐकलीच नाही.आणि तो योग अजून ही आला नाही.पण,तेव्हा तुमचे भाषण मी ऐकले.तुमचा शांत,संयमी,वैचारिक,भावनिक,मृदू, समानता स्वभाव अनुभवला.वेळेचे भान ठेवून मनोगत ही थोडक्यात व्यक्त केले.त्यानंतर लवकरच 28 नोव्हेंबर 2024 रोजी,माननीय सूर्यकांत भसे सरांचा पुरस्कार सोहळा अन् राम सर्वगोड सरांचे ,"फॉर्महाऊस" या पुस्तकाचे रुपीनगर येथील ज्ञानदीप शाळेतील प्रकाशन,पुरस्कार वितरण सोहळा निमित्त पुन्हा योग आला आणि धन्य पावले.तेथे ही कार्यक्रम सुरू असल्यामुळे तुमच्याशी फारसे बोलता आले नाही.पण,तुम्हाला ऐकता आले.कार्यक्रम संपल्यावर तुम्हाला मी माझे पुस्तक "मी प्रतिमा माझी प्रतिमा" हा काव्यसंग्रह भेट म्हणून दिले...ते देत असतांना झालेले थोडक्यात बोलणे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचा मला आलेला एसएमएस.इतक्या गडबडीत असतांनाही तुम्ही आवर्जून एसएमएस केला....मी आपला काव्य संग्रह वाचतो.मनाला खूप मोठे समाधान वाटले....अत्यानंद झाला...... इतरांना समजून घेणे किती महत्त्वाचे असते हे तुमच्या कडून समजून घेतले.
         कार्यक्रम मध्ये तुमच्या भूमिकेने प्रभावित झाले.भारती सरांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना अर्पण म्हणून आपण इतके मोठे सोहळे दर महिन्याला घेतात.ते ही शाळेत जावू न...विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या सोबतच...कारण बाबा भारती सर ही एक शिक्षक होते.बाबा भारती सरांचे कार्य सर्वदूर जावे..त्या निमित्ताने...साहित्यसेवा घडावी....वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा आपण सन्मान करतात.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन तुम्ही निरपेक्षपणे करतात...मनापासून प्रत्येक कार्य करतात..तरी पडद्याआड राहतात...स्टेजवर बसायलाही तुम्हाला आवडतं नाही.तुम्ही पुरस्कारार्थींची जी मुलाखत घेतात..ती अफलातून.प्रश्नांची मस्त बॉलिंग करतात.....खूप छान.तुमच्या कार्याला माझा खरचं मानाचा मुजरा.
          तुमचा पहिला काव्यसंग्रह "हृदयस्पंदन".... किती सुरेख नाव.... हे नाव सूचन खूप अभिमानास्पद.हृदयाचे स्पंदन हे जीवंत पणाचे लक्षण.....पुस्तकास लाभलेली उध्दव कानडे सरांची  प्रस्तावना,माननीय नारायण सुर्वे सरांच्या शुभेच्छा...तुमचे मनोगत....अन् त्यातील सर्व कविता.. खरचं हृदयाचे स्पंदन वाढवतात.काव्यसंग्रह माध्यमातून....त्यातील कवितांमधून तुम्हाला जाणले,समजून घेतले.आजच्या या 21 व्या शतकातील एक व्यक्ती इतकी समाज सेवा करतो...ते ही पडद्यामागे राहुन..अविरतपणे.विश्वास पटत नव्हता पण,प्रत्यक्ष पाहिले ,तुम्हाला ही सेवा करतांना.जो तो स्वतः ला मोठे करण्याच्या नादात असतो,सन्मान करून घेण्याच्या नादात.इतरांना सन्मान देणे...हा विचार फक्त सुपीक,परिपक्व,समानतावादी,मानवतावादी मेंदूतच फक्त येवू शकतो.ते म्हणजे तुम्ही.आजकाल पुरस्कार गलोगल्ली विकला,वाटला जातो. गलोगल्ली त्याचेही दुकाने थाटली गेलेली आहेत.कोणते तरी संमेलन भरवयचे अन् नाना नावाने पुरस्कार ठेवून वेगवेगळ्या रकमेने तो वाटायचा.तेथे फक्त पैसा पाहिला जातो.पण,या भ्रष्ट,बाजारू,क्रूर प्रथेला फाटा देवून आपण अचूक,सन्मानाचे,प्रतिष्ठेचे कार्य करतात याचा मज अभिमान वाटतो.या सेवाभावी व्यक्तीची उशिरा का होईना,योग्य वळणावर ओळख झाली.कोणाचा विश्वासही बसणार नाही..असे आपल्या आजूबाजूला घडते.सर,तुमच्या प्रत्येक कार्याला माझ्या शुभेच्छा असेल.जितके सहकार्य करता येईल तितके करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न करेल.
             तुमच्या साऱ्याच मुलाखती  लक्षपूर्ण ऐकल्या,पुस्तके वाचली...तुम्हाला समजून घेतले.काव्यसंग्रह सोबत .. काल म्हणजे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झालेला लेख संग्रह म्हणजे विचारवंतांचे अंतर्मन ...खूप भावला.वाचलेल्या पुस्तकाची टिपणे काढणे अन् नंतर त्याचे पुस्तक होणे किती अभिमानास्पद.कारण,विचारवंतांचे विचार ऐकणे,ते समजून घेणे,त्यांचे टिपणे काढणे...खूप मोठे कार्य तुमच्या हातून घडले.तुम्हाला ज्या ओळी भावल्या..त्याची तुम्ही नोंद घेतली..आणि तुम्हाला समजलेल्या भाषेत ते तुम्ही व्यक्त केले,लिखित स्वरूप दिले...थोडे काम नाही हे, जे तुम्ही केले...तो विचार पटवून देणे खूप मौल्यवान कार्य आजतागायत तुम्ही करतात.सर्वच विचारवंतांचे विचार खरच खूप मौल्यवान आहे...अन् तेच मनाला भावले.कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्यांचे अंतर्मन समजून घेणे गरजेचे आहे.जसे बोलतात तसे आपले वर्तन असले पाहिजे.सर्वच जण तुम्हाला मानतात.तुमची प्रतिमा निर्मळ आहे,तिला कोणत्याही घटनेने मलील केलेले नाही.नावाप्रमाणेच तुम्ही आहात.वडिलांनी तुम्हाला ठेवलेल्या नावाचे तुम्ही सार्थक केले.यासाठीच आपले नामकरण केले जाते.आपल्या नावाला तरी प्रत्येकाने जागलेच पाहिजे...याचे उत्तम उदाहरण तुम्ही आहात.
         या वयातही कामाला झोकून देण्याची तुमची पद्धत,कधीच कोणत्या कामाचा कंटाळा नाही.सतत कामात तत्पर.नीटनेटके,पद्धतशीर काम करणे,नियोजनही स्वतः च करणे.कुटुंबाला फारसा वेळ तुम्हाला देता आला नाही,पण पत्नीचे सहकार्य उत्तम लाभले...त्यामुळे तुम्ही इतकी उंच भरारी घेतली.ते तुम्ही कबूल ही केले.आवर्जून पत्नीचा तुम्ही उल्लेख ही करतात,त्यांच्या कार्याचा तुम्हाला विसर पडला नाही.आपल्या आईचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत.त्यांचा च फोटो तुमच्या मोबाईल स्क्रीन वार ही आहे.हातात मोबाईल घेतल्या घेतल्या आई तुमच्या समोर येते...जी तुमच्या रोमारोमात सामावली आहे.जिने तुम्हाला घडविले,जी कधी डगमगली नाही,तुम्हाला घडविण्यासाठी कायम धीट पण उभी राहिली,जिने कधीच हार मानली नाही,तुमच्या कार्याला कायम सोबत करत राहिली.इतके मोठे तुम्ही झालात ..पण,तुमच्या आईसाठी कायम तिचे लेकरू बनून राहिला.तिची छत्रछाया तुम्हाला चांगल्या पैकी लाभली...धन्य आहात तुम्ही व तुमची आई.एका देवीप्रमाणे आईस तुम्ही पूजतात,तिला मान सन्मान देतात.जी आता तुमच्या सोबत शरीराने नाही,पण मनाने,विचाराने कायम तुमच्या सोबत आहे.तुमच्या रोमारोमात तुमच्या प्रेमळ आईचेच संस्कार रोवले आहे.श्यामच्या आईने जसे त्यास घडविले तसे तुम्हाला तुमच्या आईने तुम्हाला घडविले.उत्तमांच्या आईने उत्तम यांना घडविले."उत्तमची आई" याचे लेखन तुमच्या हातून घडावे,ते सर्व वाचक वर्गास म्हण्याओएक्षा विद्यार्थी वर्गाला वाचायला,अभ्यासायला मिळावे.म्हणजे पुन्हा घरोघरी श्याम घडतील.तुमच्या प्रेरणेने नक्कीच प्रत्येक जण माणूस म्हणुन घडेल.आपल्या भारताला भ्रष्टाचाराची  वाळवी लागलेली आहे.ती समूळ नष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.असे कोणतेच क्षेत्र राहिलेले नाही की,जेथे भ्रष्टाचार होत नाही.आचार,विचारच भ्रष्ट झालेत.घरातूनच मुलांना याचे प्रशिक्षण मिळते काय असे जाणवते.तेव्हा,घरोघरी श्याम,उत्तम यांनी जन्म घेतले पाहिजे.या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे....
             सर,16 डिसेंबर तुमचा जन्मदिन...6 दिवस आधीच तुम्हाला मनापासून ते मनापर्यंत वाढदिवसानिमित्त मोरपंखी शुभेच्छा देते.तुम्ही हे जे सामाजिक व्रत हाती घेतले आहे ते तडीस न्यावे.तुमचे विचार आम्हाला नेहमी ऐकायला लाभावे.तुमचा आशीर्वाद,तुमच्या शुभेच्छा नित्य आमच्या पाठीशी असाव्यात.नवीन संकल्पनेने तुम्ही आमच्या समोर यावे.तुमच्या विचारांची खोली खूप खोल आहे.माणूसकी,आपुलकी आपल्या रोमारोमात ओतपोत भरलेली आहे.तुम्हाला किती मौल्यवान हिऱ्यांची संगत लाभली.त्यामुळे तुमच्या विचारांना अचूक पैलू पडले गेले.तुम्ही त्या प्रमाणे घडले गेले.आम्ही किती भाग्यवान आहोत की,आम्हाला तुमचा सहवास लाभला,तुमचे विचार ऐकता येतात,तुम्हाला जाणून घेता येते.आम्हीही खूप भाग्यवान आहोत...तुमच्या माणूसकी वाटेने चालण्याचा माझा नित्य प्रयत्न असतो.ही वाट मी कधी सोडली नाही किंवा सोडणारही नाही.जे जे देता येईल ते ते देत जावे.ही वाट खूप कठीण असते,पण चालायला अवघड वाटच आवडते.
         पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!!तुमच्या विचारांची छाया कायम आम्हाला लाभो.तुमचे इतके बळ आम्हाला लाभावे.तुम्ही एक प्रेरणा आहात.एक आंतरिक ऊर्जा मिळते तुम्हाला भेटल्यावर.मला भावलेले अफलातून व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही एक.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४.
मोबाईल नंबर:-8830654661/ 9405942938

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...