Skip to main content

तिफण कविता महोत्सवाच्या निमित्ताने


  कन्नड तालुक्याला समृद्ध असा नैसर्गिक , ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गावात नाटय कलावंत असून त्यांनी ही नाटयपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे. जागर गोंधळ, कीर्तन, भारूड आदी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम करणारे मान्यवर येथे आहे. आदिवासी ठाकर, भिल्ल आणि बंजारा हे समुदाय आजही  आपले सांस्कृतिकपण जपतांना दिसतात. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि गावोगावी होणाऱ्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तालुक्याचे भूमिपुत्र मा. मानसिंह पवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने कन्नड तालुका महोत्सव, लोकतेने बाळासाहेब पवार सांस्कृतिक उत्सव आणि आता सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव, फिल्म फेस्टिवल, व्याख्यानमाला तसेच इतर कार्यक्रम सातत्याने होत आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा जिजाऊ महोत्सव, पिशोरच्या समता विद्यालयाचा समता महोत्सव हे तालुक्याच्या नावलौकिकात महत्वाचे योगदान देत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यिक कार्यक्रम घेवून ही साहित्य चळवळ पुढे घेवून जातांना दिसतो आहे. प्राचार्य डॉ. विजय भोसले हे साहित्य प्रेमी असल्यामुळे या चळवळीला ते बळ देतात. डॉ. सिताराम जाधव हे ही अनेक कार्यक्रम घेत असतात. तिफण हे त्रैमासिक कन्नड येथूनच प्रसिद्ध होत आहे. हे केवळ एक मासिक राहिले नाही तर ती एक वाङ्मयीन चळवळ झाली आहे. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेची तालुका शाखा येथे कार्यरत असून दरवर्षी प्रा. डॉ. शिवाजी हुसे यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव ग्रामीण भागात आयोजित करण्यात येतो. अनेक कवी, लेखक पुढे येत आहेत. त्यांच्या वाटचालीत पत्रकार व पत्रकार संघाचे योगदान महत्वाचे ठरत आहे. शिवनातीर हे दै. तालुक्याचे भूषण आहे . या वर्षी तिफण कविता महोत्सव ५ जानेवारी २०२५ रोजी मेहेगाव ता. कन्नड येथील भगवान गडावर होत आहे या महोत्सवात राज्यभरातील कवी व कवितेचे अभ्यासक सहभागी होतात. घाटमाथा भगवान गड मेहेगाव ह्या पवित्र परिसरात होणारे, तिफण साहित्य परिवाराचे हे एक साहित्य संमेलन म्हणजे आम्हा, भगवानगड, मेहेगाव, व वासडी पंचक्रोशी साठी, एक दुर्लभ पर्वणी असणार आहे, हे ठिकाण पवित्र आहे, तीर्थस्थळासोबत ते एक प्रेरणा स्थळ सुद्धा आहे, कारण ह्या गडाची जेव्हा पायाभरणी भूमिपूजन झाले होते, तेव्हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब, ह्या ठिकाणी आले होते, तसेच भगवानगड पाथर्डी चे महंत वेद शास्त्र संपन्न महर्षी परमपुज्य अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री, नामदेव शास्त्री सानप हे सुद्धा आले होते, म्हणून हे ठिकाण एक ऊर्जा देणारे, उष्मा देणारे, प्रेरणा देणारे ठिकाण आहे, 
    वैराग्य मुर्ती भगवान बाबा ह्यांनी आजीवन बहुजन समाजासाठी ज्ञान दान करण्याचे काम केले, जो समाज कुठेतरी खितपत पडला होता त्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बहुजन समाजाला एक नवी दृष्टी दिली, जीवनाचा अर्थ समजवला, शिक्षणाचे महत्त्व समजावले, म्हणून आज हा दुर्लक्षित बहुजन भटका समाज शिक्षण रुपी वाघिणीचे दूध पिऊन शिक्षणात व प्रशासनात, व राजकारणात सुद्धा आपले एक अढळ स्थान निर्माण करून स्थिर झाला आहे,
      संत महंताच्या पावन पद स्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या  ठिकाणी ह्या साहित्यरुपी तीर्थ प्राशन करायला ह्या ठिकाणी एकत्र येणार आहोत,
जे साहित्य संमेलन, फक्त ऐकून होतो, मोठ मोठ्या शहरात होणारी साहित्य संमेलन आमच्या भगवान गड मेहेगावं येथे आदरणीय प्रा, शिवाजी हुसे सर, ह्यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून होत आहे, ह्या कविता महोत्सवामुळे एक नवी सांस्कृतिक चळवळ उभी राहील,
ग्रामीण दुर्गम भागातील कवींना लिहिते होण्याची, व्यक्त होण्याची प्रेरणा मिळेल, कविता महोत्सव म्हणजे एक पर्वणी, एक वारी, साहित्य गंगा रुपी जल प्राशन केल्याने    जीवन विचाराने समृद्ध होईल,
   वाचाल तर वाचाल, ह्या म्हणीप्रमाणे वाचन चळवळीला चालना मिळेल, पुस्तक वाचल्याने मस्तक बदलते, ह्या उक्तीनुसार विचारातून समाज परिवर्तन होत असते, व्यसनाधीनता नाहीशी होते,
      विद्यार्थी वर्ग जो उद्याच्या भारताचे भविष्य आहे, त्यांच्या मनावर व जीवनावर संस्कार करण्याचे काम ह्या साहित्य संमेलनातून उभे राहील, शिक्षकवृंद जे विद्यार्थी जीवन घडवतात त्यांना एक नवी दिशा, व प्रेरणा मिळेल,
    आपल्या घाटमाथा भागात, राम नगर चे शेळके दादा , भिमराव सोनवणे वासडीकर,मोरस्कर अण्णा, तसेच , रानकवी अरुण भाऊ, जन मनाचे लाडके माऊली, पेरणीकार गायके भाऊ, बहुरंगी कार लक्ष्मण वाल्डे संदीप वाकडे, सगळ्यांना घेऊन चालणारे आमचे लाडके सर प्रवीण दाभाडे,ह्यांना, सर्वांना घडविण्यात तिफण परिवाराचा मोलाचं वाटा आहे,
    आज आपल्या ह्या साहित्य परिवारामुळे आपल्या तालुक्यातील अनेक कवींना काव्य लेखन करायला प्रेरणा मिळाली, गेल्या वर्षी लक्ष्मण वाल्डे ह्यांना,बहुरंगी, कविता संग्रह प्रकाशित करायला महाराष्ट्र शासन साहित्य मंडळाचे अनुदान प्राप्त झाले, तर ह्या वर्षी, सर्वाची लाडकी माऊली अर्थात, ज्ञानेश्वर गायके ह्यांच्या , पेरणी, ह्या काव्य संग्रहास हा बहुमान प्राप्त झाला आहे, उत्कृष्ट निवेदक संदीप वाकडे सर , सुरेश औटे, ब्रह्मानंद गोसावी, ह्यांना काव्यप्रतिभा आविष्कार पुरस्कार प्राप्त झाले,
 अरुण थोरात, तसेच दत्ता मोरस्कर, ह्यांनी पत्रकारिता सांभाळून आपल्या काव्य प्रतिभेला नवा साज दिला, 
    हे सर्व शक्य झाले, ते शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील मराठी विभाग प्रमुख,मआदरणीय प्रा, शिवाजी हुंसे सर ह्यांच्या मुळेच,
   कन्नड तालुक्यात दरवर्षी हा साहित्य मेळावा आयोजित करून, ग्रामीण भागातील नवं कवींना सरांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळें अनेक नवंकवी लिहिते झाले, बोलते झाले, 
     आमचा परिसर हा निसर्गसंपन्न,दुर्गम, डोंगराळ भाग, सातमाळा डोंगररांगानी, वेढलेला असा आहे, निसर्गानं मुक्त हस्ताने ह्या परिसरावर उधळण केलेली आहे,
विपुल वन संपदा, गौताळा अभयारण्य, अंजना, पुर्णा, नद्या, बारमाही बागायती शेती, गावरान आंब्याची झाडे, ऊसाचे क्षेत्र, त्यामुळं 
गुऱ्हाळ व गुळासाठी, चिकुसाठी, जंगलात अनेक औषधी वनस्पती, बिबटे हरीण, कोल्हे, लांडगे, अनेक पशू पक्षी, असा जैवविविधता, जपणारा हा परिसर आहे, नेहमी थंड आल्हाददायक शुद्ध हवा, पर्यावरणपूरक असे वातावरण ह्या परिसरात असते,
     अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र, असल्याने  समाज सुद्धा वारकरी संप्रदाय,, तसेच महानुभाव पंथ, वारसा जपणारा हा परिसर आहे, एकेकाळी निजामाच्या तावडीत असलेला हा भाग, तेवढाच निकराने स्वातंत्र लढ्यात अनेक शूर वीरांनी, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यात करंजखेड चे काकासाहेब देशमुख हे आघाडीवर होते,
     आज ह्या भागातील अनेक तीर्थक्षेत्रामुळे हा भाग जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे,
 त्यात प्रामुख्याने, वैराग्य मुर्ती भगवान बाबा मंदिर भगवान गड, ज्या ठिकाणी आपण आज हा साहित्य पंढरीचा हा यात्रोसत्व साजरा करत आहोत,
     तसेच मेहेगाव व नेवपुर येथील शनिदेव संस्थान, हस्ता, येथील, नरसिंह संस्थान, देवपुळ, येथील, नवसाचा राजा, आपल्या भक्तांच्या, मनोकामना, पूर्ण करणारा,
गणपती, वासडी येथील, डोंगराच्या कुशीत असलेले,स्वयंभू महादेवाचे, त्रिकुटेश्वर संस्थान, निंभोरा, येथील, मदनशावली पीर बाबा, तपोवनचे गौताळा अभयारण्य भागात असलेले जगदंबा माता मंदिर, तसेच जिल्ह्यात प्रसिद्ध असे, पिशोरचे हिराजी बाबा संस्थान, वाकी शिवेश्वर, शेलगावं संस्थान, व नागपूर पुर्णा तीरी असलेले नागेश्वर महादेव संस्थान, अशी अनेक धार्मिक क्षेत्र ह्या भागात आहे,
       सर्वधर्म समभाव , सामाजिक समता बंधुता, एकोपा जपणारा हा परिसर आहे,
   ह्या भागात, ऊस जास्त असल्याने पिशोरचा गावरान केमिकल रहीत गुळ आज जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, तसेच वासडी येथील पेढा पण संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे,
   जी स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वर येथे पिकतं असते, ती स्ट्रॉबेरी आज हस्ता ह्या गावाने उत्पादित करून जिल्ह्यात नाव कमवले,
   अंजना सागर प्रकल्पामुळे मुबलक पाणी ह्या भागात नैसर्गिक रीत्या असते, भूजल पातळी चांगली असल्याने, अद्रक, मका, कापूस, ऊस, गहू, भाजीपाला, ह्यामुळे संपन्न असा हा परिसर आहे,
    सामाजिक, शैक्षणिक, कार्यात अग्रेसर असणारा, हा परिसर, आज अनेक क्षेत्र यश किर्ती, उन्नती चे, यशोशिखर पादाक्रांत करत आहे,
  अशा ह्या भागात होणारा हा साहित्य मेळावा, ह्या भागाचा गौरव वाढवणारा  आहे, ह्यात शंका नाही,


भिमराव मुरलीधर सोनवणे,
वासडी, ता, कन्नड,
मो, न -; ९४०४५४९७८८,

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...