सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी बोगस विवाह संस्थेचे जाळे पसरले असल्याने गरजू वधूवरांच्या पालकांनी त्या पासून सावध रहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.या बोगस विवाह संस्था प्रथम गरजू वधू वरांच्या पालकांशी संपर्क साधतात, त्यांच्या अपेक्षा विचारुन घेतात,त्याच प्रमाणे मन मानेल तशी फी आकारली जाऊन बोगस विवाह संस्थेत नाव नोंदणी केली जाते.अपेक्षित स्थळांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर, पत्ता, घेऊन ते गोपनीय ठेवले जाते.व समोर पालकांना सांगतात " तुम्हाला हवे तसे स्थळ आलेले आहे.आम्ही बैठक घडवून आणतो, त्या आधी तुम्ही बैठकीची अमुक अमुक रक्कम जमा करावी.गरजू पालक पैसे जमा करतात, पुन्हा विवाह संस्था बैठकीच्या आयोजनाचे वेळी वेगवेगळी कारणे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करतात.यात पालक फसतात.मोबाईल वरुन विवाह संस्थेशी संपर्क केला असता "आपण नंतर संपर्क करा" म्हणून कळविले जाते, किंवा फोन उचलला जात नाही,अशा बोगस विवाह संस्थेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.पुणे, मुंबई, मुंबई उपनगरे,लातुर, सोलापूर, सातारा,या ठिकाणी व पश्चिम महाराष्ट्र मधील काही ठिकाणी अशा बोगस विवाह संस्था असल्याचे निदर्शनास आले आहे.पुणे हडपसर येथील शुभ मंगल विवाह संस्थेनी अनेक पालकांना फसविले आहे.नाव नोंदणी पूर्वी गोड बोलून लग्न जमविण्यासाठी उत्सुकता दाखवतात,व विवाह संस्थेची फी भरल्यानंतर टाळाटाळ करतात.पण गरजू वधूवरांच्या पालकांनी मात्र यां बोगस विवाह संस्थे पासून सावधानता बाळगावी, विवाह संस्थेच्या गोड गोड बोलण्यावर विश्वास नये.सुंदर मुलींचे व सुंदर मुलांचे फोटो व परिचय गरजू वधूवरांच्या पालकांना पाठविला जातो,व तुम्हाला त्या स्थळाचा होकार आहे असे सांगितले जाते, परिचय मध्ये पालकांचे एकमेकांना संपर्क करण्यासाठी पत्ता व मोबाईल नंबर नसतो, पुन्हा बोगस विवाह संस्था पालकांना पैसे जमा करायला सांगतात, बैठकीच्या आयोजन दरम्यान कोणते तरी कारण सांगून नकार दिला जातो.भरलेले पैसे परत मिळत नाही, पुन्हा गरजू वधूवरांच्या पालकांना पुढील स्थळाचा खोटा विश्वास दिला जातो, सुंदर मुलींचे व सुंदर मुलांचे फोटो पसंत पडणाराच असतो , बोगस विवाह संस्था फसवे गिरी करत असतात.पालकांना एकमेकांना संपर्कात येऊ देत नाहीत, मध्यस्थी करून पैशाची मागणी करत असतात.बिचारे गरजू वधूवरांच्या पालक फसतात.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment