श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
वारसा साहित्य मंच मराठवाडा आयोजित 25 मे ला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी साहित्यीक रज्जाक शेख श्रीरामपूरकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.स्वागताध्यक्षपदाचे निवडपत्र उद्घाटक साहित्यिक भारत सातपुते(लातूर),वैभव धर्माधिकारी(पुणे),अर्जुन गायकवाड( बीड),नवनाथ शिंदे(अहील्यानगर),पवन शेळके, ज्ञानदेव दिघुळे आणि इतर सर्व कोअर कमिटी यांच्या हस्ते हॉटेल शांतीकमल शिर्डी येथे देण्यात आले. राज्यस्तरीय कविसंमेलनात नामांकित कविकवयित्री यांची हजेरी लागणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.
मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,नाशिक,वर्धा,अंमळनेर,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे, येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन,कन्नडचे तिफण संमेलन, श्रीरामपूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संमेलन,नेवासा येथील शिवस्वराज्य काव्यसंमेलन,देवगड येथील षटकोळीसंमेलन,एक मैफिल कवितांची श्रीगोदा तसेच बोधी ट्री एज्युकेशन संस्थेच्या कविसंमेलनाचे ते माजी कवीसंमेलनाध्यक्ष आहेत.या निवडीबद्दल कै.किसनराव डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पैलवान नानाभाऊ डोंगरे,ग्रामीण कवी आनंदा साळवे,आदर्श शिक्षक देविदास बुधवंत,नितीन गायके,संजय वाघमारे,आत्माराम शेवाळे,चंद्रकांत परदेशी,डॉ. सलीम शेख, ऍड.मोहन,दिवे आदीनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment