Skip to main content

*कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्यसंग्रहाचे ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये शानदार प्रकाशन*

ठाणे:- रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विधानसभा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलपुष्प काव्यसंध्या या कार्यक्रमात कवी शिवदास वाव्हळ लिखित हा काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून आज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नीलपुष्प साहित्य समुहाचे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेश साबळे, ओतूरकर, प्रमुख पाहुणे कवी मा. डॉ, मारुती नलावडे, आंतरराष्टरीय चित्रकार मा. सुरेश डुंबरे, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे, गायिका संगीत विशारद मा. सौ सुमुग्धा माळी आणि उपस्थित कवी, लेख साहित्यिक अनेक शैक्षणिक, सामजिक संस्थेतील वाचक रसिक मंडळी तसेच कवी शिवदास वाव्हळ यांचा परिवार आणि पाहुणे, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर प्रसंगी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन झाल्यावर कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सुमुग्धा माळी यांनी सुंदर ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक सौ. मीनल चौधरी आणि पाहुण्याचा परिचय निवेदिका सौ. निलम शेलटे यांनी करुन देत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान कवी शिवदास वाव्हळ आणि त्यांच्या परिवाराने केला. 
यानंतर कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे, ओतूरकर यांनी सर्व उपस्थित मंडळीचे स्वागत करुन. उध्वस्त भिंती या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले असे जाहीर केले.. त्यांनतर सदर काव्यसंग्रहावर दूर वरून आलेल्या शुभेच्छा संदेश सौ. मीनल चौधरी आणि सौ मेघना देव यांनी त्यांचे खुप सुंदर वाचन केले.
स्वतः कवी शिवदास वाव्हळ यांनी हा काव्यसंग्रह म्हणजे माझ्या मनाची वेदना आहे. जीवन जगत असताना आलेल्या अनुभाचा कटू गोड आठवणी आणि समाजात घडत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचा वेध घेताना आयुष्याची कशी दमछाक होते. स्वतःचे जीवन आणि इतरांचे जीवन यात काय फरक आहे. यांचा हा काव्यसंग्रह एक नमुना आहे. 
यावर सर्व पाहुण्यांनी आपले या काव्यसंग्रहाबद्दल आपले मनोगत सादर केले. डॉ मारुती नलावडे यांनी पुस्तक विकत घेवून वाचावे. 
प्रा.सुरेश डुंबरे यांनी ज्यांनी सोसले आहे. तेच असे म्हणाला भिडणारे लेखन करू शकतात.
प्रा. नागेश हुलवळे यांनी आपल्या सुंदर गायकी शैलीत सबंधित पुस्तकातील कवितांचा सुमधुर स्वरात सादर केली. 
सुमुग्धा माळी या संपूर्ण पुस्तकातील कविता गावून सादर करण्यासारख्या आहेत. या सोबत त्यांनाही एक कविता सुंदर पद्धतीने गावून सादर केली.   त्यांच्या सुंदर गायकीने सभागृह मंत्रमुग्ध झाले. 
आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेश साबळे,ओतूरकर म्हणाले.. आपण वाचाल तर वाचाल असे नुसते म्हणतो. पण किती लोक पुस्तके विकत घेवून वाचतात. समाजात कुटुंब पद्धतीचा ऱ्हास तर झालाच आहे. पण त्यासोबत पत्र लिहिण्याची पद्धतही निकालात निघाली. सावित्री बाई फुले यांनी महिला शिकाव्यात म्हणून पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. त्या भिडे वाड्याची काय अवस्था आहे. आपण ती उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. इंग्रजीच्या उदात्ती कारणामुळे मराठी बोलायला लोकांना वेळ नाही. तिथं पुस्तक विकत घेवून लोक वाचतील असे आपणास वाटते काय? असा प्रश्न करुन 
कमीत कमी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वेळी भेट म्हणून तरी, पुस्तके भेट द्यावीत. त्यामुळे तरी, घरात जो कोणी वाचक वर्ग असेल किंवा वयोवृध्द मंडळी असतील ते तरी विरंगुळा म्हणून वाचतील.
यानंतर नीलपुष्प मंडळाची काव्यसंध्या कार्यक्रमांची खुप सुंदर मौफिल जमली.. यात अनुक्रमे कवी अभिमन्यू शिरसाट, मास्टर राजरत्न राजगुरु, शाहीर किरण सोनवणे,     डॉ. मारुती नलावडे, प्रा. सुरेश डुंबरे, कवयित्री सावित्री ताई झांबरे, सुनीता ताई भालेराव, प्रज्ञारणी सोनवणे, कमल अस्वले, लीलाताई गाजरे, पत्रकार सुभाष जैन, प्रा. नागेश हुलवळे, निवेदिका नीलम शेलटे, राजेश साबळे, ओतूरकर अन्य मान्यवर कवींनी आपला सहभाग नोंदविला. खुप सुंदर काव्यसंध्या संपन्न झाली..
या कार्यक्रमासाठी आयोजक मंडळी पैकी कवी शिवदास सरांचा मुलगा श्री. आणि सौ.जयेश वाव्हळ,  मुलगी सौ वृषाली वाघोली जावई श्री. प्रशांत आणि सर्व वाव्हळ परिवाराने अतिशय मेहनत घेवून कार्यक्रमांची शोभा वाढविली. सदर कार्यक्रमास वाव्हळ परिवारातील आप्त ईष्ट नातेवाईक यांची उपस्थिती खुप चांगली होती. यावरुन शिवदास यांचा मित्र परिवार खुप संस्कारी आणि प्रेम आणि जिव्हाळा यांचे प्रतिक वाटले त्यासाठी या ठिकाणी 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली.
सदर कार्यक्रमाचे आणि नीलपुष्प काव्यसंध्येचे सुंदर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शनाची गोड कामगिरी निवेदिका सौ नीलम शेलटे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत होवून या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.
असे आयोजकांनी कळविले आहे.
शब्दांकन 
राजेश साबळे,ओतूरकर

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...