Skip to main content

"मित्रांनीच केलं मित्राच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन "


“आम्ही संघवीकर”
           संघवी केशरी कॉलेज 
          माजी विद्यार्थी (बॅच १९८७)
   स्नेहमेळावा २५ जानेवारी २०२५.
..सरता सरता सरला ३७ वर्षांचा कालखंड तरी ह्या दोस्तांची मैत्री आजही आहे अखंड त्या मैत्रीला नाही कोणताच मापदंड एकजूटीचा दाखला देत पुन्हा जमले सारे देऊनी प्रतिसाद उदंड.श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ,श्री स्वामी समर्थ मंदिरा समोर,चिंचवडे गार्डन च्या निसर्ग रम्य आणि मनमोहक वातावरणात चिंचवडगाव येथे संघवी केशरी महाविद्यालयातील १९८७ च्या
बॅचचा स्नेहमेळावा उत्स्फूर्तपणे साजरा झाला.शतकापार मिळालेला भरघोस प्रतिसाद आयोजकांनी घेतलेल्या पऱिश्रमाच्या यशाची पावती देणारा ठरला.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कॉलेज चे प्राचार्य कै.सुरवसे सर यांना आदरांजली वाहण्यात आली .क्षणभर सर्वजण सरांच्या आठवणीने भारावून गेले .
या मेळाव्यात कार्यक्रमाची सुरवात चिंचवड गावातील युवा नेतृत्व भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे यांच्या व अमित पांढरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणेच गप्पाटप्पा,गाणी,मौजमजा,सुरूची भोजन सर्वकाही होतेच परंतू अजूनही खास वैशिष्ट्य होते ते म्हणजे एका कवी मित्राच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा.शब्द आणि शब्दच  ज्याच्या ध्यानीमनी शब्दांच्या राशी हेच त्याचं धन ,हीच त्याची पुंजी.ज्याप्रमाणे आकाशातील  रवि आपल्या तेजाने संपूर्ण धरणी उजळतो तसाच हा कवी त्याच्या  लखलखीत लेखणीतून उदयास येणा-या
वैविध्यपूर्ण काव्यनिर्मितीद्वारे 
रसिकांना अनोख्या कल्पनाविश्वाचा साक्षात्कार घडवतो.शब्दांची सांगड घालून,सर्व स्तरातील विविध विषयांवर यमक जुळवून समाजाचं प्रतिबिंब सादर करून रसिकांच्या पसंतीस उतरवणं ही कला अवगत असलेला हा कवी,कधी त्याच्या खळाळत्या काव्यधारांतून उडवतो हास्यकारंज्याचे तुषार ,कधी धारदार लेखणीने घेतो समाजकंटकांचा  खरपूस समाचार ,कधी राजकारणावर कोपरखळी मारून टिप्पणी करतो   कधी,वाढदिवसानिमित्त मित्रमैत्रिणींना चारोळीची अनोखी भेट बहाल करतो ,कधी प्रवाहाविरुद्ध वाहून समस्यांवर परखडपणे ताशेरे ओढून  वाचा फोडतो तर,कधी हळवा होऊन एखाद्याच्या डोळ्यातील भावभावनांना आपल्या नजरेतून अलवार टिपून काव्यमालेत  गुंफतो,आणि कधी तर कमाल म्हणजे देहातील चैतन्याचा जिथे अस्त होतो. तेव्हा धगधगणा-या चितेवरचा नश्वर देह पाहून अटळ मृत्यूचे सत्य सांगणा-या ह्या कवीच्या  कवितेचा स्मशानात देखील उदय होतो.अशा शब्दधनसमृद्धीने सधन बहुगुणी  शब्दप्रेमी कवीचे वर्णन करणे म्हणजे वर्णन करणा-याने कवीच्या शब्द भांडाराने ओतप्रोत भरलेल्या  घड्याकडे पाहून आपल्या तोकड्या शब्दसंचयाने निःशब्द होण्यासारखेच आहे.बुद्धीचे आराध्यदैवत श्रीगणेशाचा चिरंतन वास असणा-या पवित्र मंदिर परिसराच्या सान्निध्यात  नाना शिवले सर व सर्व सांघविकर मित्र परिवार यांच्या शुभहस्ते कवी धनंजय इंगळे यांचा  काव्यसंग्रह “काव्यमाला" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.  योगायोगाने दिवसही एकादशीचा आला.हा एक अमृतमयी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर सुद्धा तब्बल १०० मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या सोहळ्याचे साक्षीदार होऊन आदर्श मैत्री कशी असावी ह्याचं मूर्तीमंत उदाहरण यांच्या एकजुटीतून आणि कृतीतून दाखवून दिलं.अतूट,निस्वार्थी मैत्रीने आदर्श मैत्रीवर शिक्कामोर्तब केलं गेलं हे विशेषच.आजच्या काळात असे खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आणि अशी मैत्री जपून टिकवून ठेवणारे मित्र लाभणे हे दुर्मिळ आणि दुर्लभच म्हणावे लागेल
संघवीकर मित्रमैत्रिणींनी धनंजयची अफलातून काव्यप्रतिभा रसिक वर्गापर्यंत पोहचावी व यापुढे ही नवनवीन कवितांची मेजवानी मिळत रहावी ही सदिच्छा व्यक्त करून धनंजयला पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.
      राजेंद्र किरवे व सहकारी यांच्या हार्ट बिट संगीत ग्रूप च्या कलाकारांनी गाणी गाऊन वातावरणात अजून उत्साह तर आणलाच परंतु कॉलेज चे सदाबहार गायक आबा सोनवणे,संतोष शिंदे,कैलास काका गावडे,सचिन कोष्टी,सुनील गुरव,अविनाश कदम,सुरेश मुळे,संतोष सावंत ,मधुकर इंगळे,माधवी गोखले,वर्षा पवार यांच्या गाण्यांनी धमाल आली.त्यांच्या आवाजातील गाण्यांवर चंद्रकांत बारणे आणि संघवीकरानी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला.ह.भ. प.रामदास मोरे,ह.भ.प.सुनील गडवे यांच्या गवळण आणि भारुडाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.सेल्फी पॉइंट ची मजा घेत एलजी कॅटरर्स च्या रुचकर भोजनाचा आस्वादा बरोबर च पूजा लाटकर यांचे सातारा येथील फेमस कंदी पेढे आणि सुलभा पारेख यांनी खास पुण्याहून आणलेली खुसखुशीत जिलेबी याचा ही स्वाद घेत जुन्या नवीन आठवणीत गप्पा गोष्टी करत,नुकत्याच काढलेला ग्रुप फोटो ची सुंदर फ्रेम घेऊन एकमेकांस निरोप देत 
 कार्यक्रमाची सांगता झाली.
      संतोष शिंदे याने जवळपास सर्व जणांना आवर्जून फोन केले आणि आमंत्रित केले,संतोष उर्फ आबा निंबाळकर आणि उमाकांत उर्फ आबा ह्या दोघांचे आयोजन त्याच बरोबर सुनील गुरव,मनोज ओसवाल,रविंद्र मानकर,नंदू नाईक,सचिन कोष्टी
त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूपच परिश्रम घेतले दिपक परदेशी ने फ्लेक्स चे डिज़ाइन आणि प्रिंटिंग केले.
      राजू करपे,राजू घोलप,कल्याण पागिरे,शहाजी मासुळकर,गोपी सैंदाणे,विष्णू पोटे,चेतन पटेल, मकरंद,प्रफुल्ल पुराणिक ,सुनील लोखंडे,आशा ,अचल ,भारती ,मंजू ,मिना,शैला यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवली .
        
कैलास गावडे PSI (पिंपरी चिंचवड) 
विनया तावडे PSI मुंबई पोलीस
अनिता चुरी ASI( पिं. चिं, कमिशनर ऑफिस) 
तुकाराम शिंदे,रंजना चौधरी,पूर्णिमा ललवणी,विनोद ढमाले,अर्जुन लंके,बाळासाहेब काटे,संगीता भोर,बाळासाहेब मराठे,सुनील दातीर,बाबू चिंचवडे,राजाभाऊ कोराळे,विनोद कस्पटे,संतोष सावंत,राजेश कारेकर,अशोक जगताप,हेमा बांगर,मुकुंद पाटील,मीना गराडे,नंदुभाऊ लांडगे,संपत बोत्रे,विजय चव्हाण,मानसी कदम,
अरुणा भोसले ,प्रकाश वांगीकर,संजय पाटील,सुनील गारगोटे,नवीन पारख,सुनील भालेकर,अनिता गलांडे,संभाजी भंडारे गौतम शेडगे,दत्ता शिगवण,संगीता रसाळ,शोभा रावते,अमर जगताप,उज्वला बडदे ,शरयू राणे,चंदू बारणे,सुहास कदम,रेखा जाधव,लतिश बलकवडे,मधू इंगळे,नीलम मोरे,सुभाष गरजे,सुनील कारखिले,विजय तळेकर,
आदेश शहा,राजू खळदकर,तानाजी साने,चंद्रकांत पवार,विश्वास काळभोर,विनोद नरम,सुजित जाधव,अनंत किंजाळकर,दत्तभाऊ गवारे,आपल्या उपस्थितीनेच कार्यक्रमाला रंगत आली आणि उत्तरोत्तर वाढत गेली आशा आनंदाच्या प्रसंगी संघवीकर चंदू बारणे यांनी कुठलाही गाजा वाजा न करतात,आपलाच मित्र मधू इंगळे माई बाल भवन या संस्थेस भरघोस आर्थिक मदत केली.
सदर कार्यक्रमासाठी दिल्ली ,अमरावती ,खेड,मावळ,पुरंदर ,
मुंबई,पुणे ,पिंपरी चिंचवड परिसरातील मित्र मैत्रिणी बहुसंख्येने उपस्थित होते.


शब्दांकन 
सुलभा पारेख 
संतोष निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...