होळी व धुलिवंदन हा आनंदाचा, उत्साहाचा सण आपल्या महाराष्ट्रात साजरे केले जातात.या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन शाळेत पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविले गेले.
शाळेचे प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभेच्छांसह उपक्रम संपन्न झाले.होळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय हरित सेना व के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.यावेळी वेग वेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली.
यातून झाडे लावा,झाडे जगवा संदेश देण्यात आला.
होळी व धुलिवंदन सणानिमित्त देखील विविध उपक्रम... निबंध लेखन,यात पर्यावरण संवर्धन काळाची गरज!, तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार करणे, काव्यलेखन,काव्य वाचन, सादरीकरण, कथाकथन,असे विविध उपक्रम,शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका,सौ.अनुपमा जाधव यांनी या उपक्रमांचे आयोजन केले. यात इयत्ता ५वी ते९वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस मॅडम, यांनी होळी व धुलिवंदन सणानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सणाबद्दल माहिती दिली.व अशा उपक्रमाबद्दल पर्यावरणाचा संदेश व जनजागृती केली जाते म्हणून असे उपक्रम राबविले जातात हे कौशल्य निर्माण करणारे उपक्रम आहेत.असे गौरवोद्गार काढले.
तसेच पर्यवेक्षक श्री.सुनिल मोरे सर यांनी होळी व धुलिवंदन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यांचा गुणात्मक विकास होण्यासाठी फायदा होईल. सौ.जाधव मॅडम यांनी पर्यावरण पुरक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविले, विद्यार्थी पर्यावरणाची काळजी घेतील.असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
शाळेच्या शिक्षिका मीना वाजे मॅडम यांनी होळी भक्त प्रल्हादची गोष्ट सांगून होळी सणाबद्दल छान माहिती सांगितली.
तसेच यावेळी सौ.अनुपमा जाधव (शिक्षिका) तसेच सुशांत चव्हाण, सानिया,पलक, विद्यार्थ्यांनी काही हास्य कविता सादर केल्या.विविध हास्य कविता ऐकून विद्यार्थी आनंदीत झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन, सुत्रसंचलन सौ.अनुपमा जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment