Skip to main content

Posts

*शिक्षक भरतीमधील टीईटीची अट शिथिल करा.*ट्रायबल फोरमची मागणी; शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांना निवेदन

राज्यातील सध्या सुरू असलेल्या शिक्षण सेवक पदभरतीमध्ये अनेक आदिवासी प्रवर्गातील उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे या प्रवर्गाची शेकडो पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे आदिवासी उमेवारांसाठी टीईटी अट शिथिल करण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री,शिक्षण आयुक्त पुणे यांना नुकतेच निवेदन पाठविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल मार्फत सध्या सुरू असलेल्या शिक्षक पदभरती (मुलाखती शिवाय) मधील दुसऱ्या रूपांतरित फेरीत मध्ये ५७१४ पदे भरती करिता उपलब्ध होती. यामध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाकरिता वर्ग १-५ व वर्ग ६-८ या गटाकरिता राज्यभरात सुमारे ७९६ शिक्षकांची पदे उपलब्ध होती. मात्र रूपांतरीत फेरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ४९ पदे भरण्यात आलेली आहेत. आज घडीला अनुसूचित जमाती प्रवर्गाची सुमारे ७४७ इतकी पदे विविध जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये रिक्त आहेत. वर्ग १-५ व वर्ग ६-८ या गटाकरिता टीएआयटी परीक्षा २०२२ आणि टीईटी परीक्षा अशी पात्रता निर्धारित कर...

*नागपंचमी सण*

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. *श्रावणे शुक्लपंच्यम्यां यत्कृतं नागपूजनम् ।* *तने तृप्यंन्तु मे नागा भवन्तु सुखदा: सदा ।।* भारतीय संस्कृतीत धार्मिक व्रतवैकल्ये , सणवार उत्साहाने आणि श्रध्येने साजरी करण्याची परंपरा अनादिकालापासून आहे. त्या सणांना हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे. या सर्वच सणाबाबत हे सण उत्सव कां केले जातात , त्याची पार्श्वभूमी काय ? त्याचे दृष्टांत कोणते याची सारी महती पुराणकाळापासून हिंदूधर्मातील ग्रंथातून , अगदी देवदेवता ,ऋषीमुनी यांच्या काळापासून अनेक कथांमधून , अनेक आपल्या प्रत्ययास येते. तसेच पुरातन कालापासून देवदेवतांच्या प्रतिकांची श्रद्धेने पूजा करण्याची प्रथा देखील आजही प्रचलित आहे. पण या सर्वांमध्ये प्रत्येक सण , उत्सवांच्या मागे  संस्कारांचं , संस्कृतीच , तसेच शास्त्रीय कारणे सुद्धा  आहेत असे मानले जाते. या साऱ्या सणांच्या बाबतीत अनेक पौराणिक आख्यायिका , दंतकथा आहेत आणि त्या सर्वश्रुत आहेत. *नागपंचमी हा असाच श्रावण* *महिन्यातील सण भारतात साजरा केला जातो.* नाग हे भगवान शंकराच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे , भगव...

वाचन छंद प्रेमी' साहित्य समूह आयोजित, 'मित्र माझा' उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप.

  बुलढाणा : नुकताच दिनांक ४ आगस्ट रोजी 'मैत्री दिन' मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या निमित्ताने, वाचन छंद प्रेमी' साहित्य समूहात  'मित्र माझा' विषयावर महाराष्ट्रसह इतर राज्यातील अनेक साहित्यिक लेखकांनी सहभाग नोंदवून,अप्रतिम काव्यलेखन केले.   साहित्यिक मा. बाबाजी हुले, कामोठे नवी मुंबई व कवयित्री स्वाती कुळकर्णी  मुंबई तसेच,कवी राहुल रतन इंगोले संभाजी नगर यांनी मैत्री विषयावर सर्वोत्कृष्ट  काव्य लेखन करुन उपक्रमाचा सर्वोत्कृष्ट मान मिळावला.  वाचन छंद प्रेमी' साहित्य समूह आयोजित,'मित्र माझा' विषयावर प्रा.पी.एस.बनसोडे, कवी बी. एस. केंद्रे, कवी वसंत गवळी, शाहीर मनोहर पवार,कवी विकास इंगळे, मा. तुळशीराम बोबडे, कवयत्री सौ. वत्सलादु सेमोराणकर,  मा. जितेंद्र सोनवणे, सदर उपक्रमाचे परिक्षक डॉ. अशोक शिरसाट अकोला यांनी ' मित्र माझा' विषयावर विविधांगी काव्यलेखन केल्या बदल सर्व सहभागी लेखकांना, वाचन छंद प्रेमी'साहित्य समूहाच्या वतीने सन्मान पत्र देउन गौरवण्यात आले.  दरम्यान, वाचन छंद प्रेमी' साहित्य समूह संस्थापक-आयोजक, मा. बबनराव वि. आराख या...

आयुष्य

नमस्कार 🙏 कवी -श्री गोरक्षनाथ कृष्णाजी पवार .निंभारी, पो. पाचेगाव ,ता. नेवासा. जि. अ. नगर.  पीन कोड नं. ४१३७२५ फोन नंबर. ९७६३७३८१८०       शेतकऱ्यांची सेवा हीच खरी सेवा आहे असं मला वाटतं . खर तर ही संपुर्ण भू मातेची सेवा आहे.  माती सुपीक झाली तर शेतकरी जगणार आहे, शेतकरी जगला तरच हे जग पण जगणार आहे.   आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून एक प्रतिनिधी निवडण्यात आला.  अहमदनगर जिल्ह्यातून मला डाँ. प्रदिपजी कांगणे सर यांच्या सहकार्याने मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्या संधीच सोनं करण्यासाठी प्रयत्न करीत आहे . आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ श्री साई भास्कर रेड्डी यांनी प्रशिक्षण दिनांक -२७। ६ ।२०२४ते २९।६।२०२४या तिन दिवसात दिले . आज आपण पहातो की वातावरणात भयंकर प्रदुशन होत आहे.  पर्यावरणात जे दिवसेन दिवस प्रदूषण तयार होत  आहे ,ते  कसं धांबवता येईल . या साठी  शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी अशी संशोधने करायला सुरुवात केली. सर्वच देश प्रदुषण करतात. पण  जगात सर्वात जास्त प्रदुशन करणारे दहा शहरे आह...