Skip to main content

आयुष्य

नमस्कार 🙏
कवी -श्री गोरक्षनाथ कृष्णाजी पवार .निंभारी, पो. पाचेगाव ,ता. नेवासा. जि. अ. नगर.
 पीन कोड नं. ४१३७२५
फोन नंबर. ९७६३७३८१८०
     
शेतकऱ्यांची सेवा हीच खरी सेवा आहे असं मला वाटतं .
खर तर ही संपुर्ण भू मातेची सेवा आहे. 
माती सुपीक झाली तर शेतकरी जगणार आहे, शेतकरी जगला तरच हे जग पण जगणार आहे. 

 आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून एक प्रतिनिधी निवडण्यात आला.  अहमदनगर जिल्ह्यातून मला डाँ. प्रदिपजी कांगणे सर यांच्या सहकार्याने मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्या संधीच सोनं करण्यासाठी प्रयत्न करीत आहे .
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ श्री साई भास्कर रेड्डी यांनी प्रशिक्षण दिनांक -२७। ६ ।२०२४ते २९।६।२०२४या तिन दिवसात दिले .

आज आपण पहातो की वातावरणात भयंकर प्रदुशन होत आहे. 
पर्यावरणात जे दिवसेन दिवस प्रदूषण तयार होत  आहे ,ते  कसं धांबवता येईल .
या साठी  शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी अशी संशोधने करायला सुरुवात केली. सर्वच देश प्रदुषण करतात. पण  जगात सर्वात जास्त प्रदुशन करणारे दहा शहरे आहेत,त्या पैकी भारतील सात शहराचा सामावेश आहे. 
हे प्रदुशन कस थांबवता येईल. 

अनेक प्रयत्न करून त्यांनी 2005 साली बायोचार चा शोध लावला.

 प्रदूषणाचे अनेक कारणे आहेत. 
रोड वरील साधनांमुळे , अनेक कंपण्या,इतकच नाही तर रोज आपल्या तोंडातुन बाहेर जाणारी हवा ही प्रदूषण करत आहे. 

म्हणुन हा कार्बन डाय-ऑक्साइड हवेत जास्त झाल्यामुळे आज उष्णतेचे प्रमाण भरपूर वाढलेला आहे असं जर काही वर्षे चालत राहिले, तर उष्णतेचे प्रमाण अधिक होईल,सुर्य आग ओकत राहील, आज आपण पहातो आहे, शहरात ए, शी, शिवाय मानुस राहु शकत नाही.खेड्यात सुद्दा प्रत्येक घरात फँनची गरज भासु लागली. आपल्या पुढच्या पिढ्या जगने कठीन होईल, आणि या भूमातेवर कोणताही जीव जंतूला आणि प्राण्यांना जगणे कठीण होईल,

 म्हणून हे प्रदूषण थांबणे अतिशय महत्त्वाच आहे  परंतु रोडवरील साधने,  कंपण्या हे आपण थांबवु शकत नाही. आसच आजुन काही वर्ष चालत राहील तर या भूमीवर भयंकर उष्णता वाढुन कोणताही जीव जगणार नाही. मानवाच ही आस्तीत्व नष्ट होऊ शकत. 


त्यावर एकच उपाय सापडला आहे .तो म्हणजे-

-"बायोचार" 
म्हणजे "हवेतील कार्बनडाँयाक्साईड खेचुन जमीनीत गाडने "(थोडक्यात आपल्या माहीती साठी "कोळसा")
हा तसा पुर्वी ऋषी मुनींनीच केलेला प्रयोग आहे, 

बायोचार हाच या जगाला उष्णते पासुन वाचवु शकतो, हे शिध्द झाले आहे. 

जगावरील भविष्यातील दुसरे संकट म्हणजे...  माती या मातीला प्रत्येक व्यक्तीने खराब किंवा विषारी करण्याचा सपाटा लावला आहे, 
जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकरी कोणतेही काम करायला तयार आहे. कारण त्याला जगायच आहे. 
 शेतकऱ्यांच्या समोर आज फार मोठा प्रश्न उभा आहे. स्वतः जगायच की पुढची पीढी जगवायची?
उत्पादन आज वाढल तरच शेतकरी जगणार आहे, कोणत्याही मालाला भाव नाही, म्हणुन उत्पादन वाढवणे. व स्वतः जगणे, हा एकच पर्याय शेतकय्रांच्या समोर आहे, उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी काही पण करायला तयार आहे. 
मजुर मिळत नाही म्हणुन तन नाशक मारु लागला, कीड नाशक फवारु लागला. कारण या शेतकय्रांना स्वतः जगाच्या स्पर्धेत जगायच आहे. शेतकय्राची चूक नाही. परंतु पुढच्या पीढी साठी ही माती विषारी करु लागला आहे. 

हारीत क्रांतीच्या नावाखाली रासायनीक खते आली. पुढचा विचार न करता शासनाने ही परवानगी दिली. उत्पादन भरघोस वाढले, पण शेतकय्रांच्या मुलांसाठी आणि पुढच्या पीढीच्या संपूर्ण जगासाठी ही माती विषारी करुन ठेवली आहे. 
परीणाम आपल्याला आजच दिसायला लागला आहे, कँन्सर, मधुमेह, सारखे आजार वाढु लागले आहेत, 

रासायनीक खताचा विचार केला तर टाकलेल्या खता पैकी पन्नास टक्के खत नत्र रुपाने हवेत उडुन जाते व कार्बनडाँयाक्साईड चे प्रदुशनचे प्रमाण वाढत आहे.
राहीलेल्या काही मातीतील खतामधे केमीकल आसते, व माती विषारी बनते.खताचा थोडा उरलेला भाग शेतकय्रांच्या फायद्यात पडतो . अशा पद्धतीने पुढचा विचार न करता शेतकय्रांना उघड उघड फसवण्यात आले आहे, 
आणि शेतकय्रांचा ही नाईलाज झाला आहे. 

पर्यायाने शेतकय्रांची मुले शेती धंदा सोडुन शहरांकडे नोकय्रा शोधु लागले आहेत. इतर व्यावसाय व नोकरीतुन पैसा घरी येऊ लागला. पण जी काळी आई उभ्या जगाच पोषन करते ही महत्वाची गोष्ट सरकार ही विसरले आणि सर्वजन विसरले. 

म्हणुन बायोचार हा सोने, चांदी, या पेक्षा हजारो पटीने मौल्यवान  आहे हे शिद्ध झालेले आहे. 

कारण हे मातीतील विषारी कण हा बायोचार खेचुन घेतो. 
कोळशाचे गुण आपण पाहु, 
लाकुड जर मातीत टाकल तर ते सडते, परंतु कोळसा टाकला तर तो मातीत हजारो वर्षे तसाच रहातो.
            हा बायोचार पासुन कंपोस्ट खत तयार होते. पाणि, नत्र स्पृरद, पालाश, व सुक्ष्म जीवानुंचे सौरक्षण करुन पिकांला किंवा वनस्पतीला पुरवतो व पीक जोमदार येते. कंपोस्ट खत पीकाला घालुन शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन करु शकतो, शिवाय कोणतही नुकसान न करता. 
असे बायोचार पासुन अनेक फायदे आहेत. 
कंपण्याना बाँयलर साठी जाळण्या करता म्हणुन बायोचार वापरला तर प्रदुशन होत नाही. व सरकार कंपण्यांना अनुदान देते. असे या बायोचार पासुन शेतकय्रांची मुले बाहेर न जाता स्वतःच वेगवेगळे प्राँडक्स बनवुन भरपुर पैसा ही स्वतःच्या शेतीतच मिळवु शकतात. 

शिवाय शेतीतील राँ मटेरीयल पासुन बायोचार बनवता येतो .
आश्या प्रकारे बायोचार हवेतुन कार्बनडायाक्साइड खेचुन वातावरण थंड करु शकतो. 
पण हा विचार प्रत्येक शेतकय्रां पर्यंत घेउन जावा लागेल 
धन्यवाद 🙏

आपला 
गोरक्षनाथ पवार

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...