Skip to main content

Posts

* डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय सातारा यांचा कै. भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर

कवि सरकार इंगळी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा तर्फे तर्फे दिले जाणारे कैलासवासी भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कादंबरी कथा कविता बालसाहित्य यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्य कृती यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार रु २५०० रु व स्मृतीचिन्ह १) कडेलूट - कादंबरी       ले .डॉ श्रीकांत पाटील २ )  'काळ ' मेकर लाइव्ह - कादंबरी        ले - बाळासाहेब लबडे राज्यस्तरीय अक्षर गौरव  विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप रु १००० व स्मृतीचिन्ह १) वसप - कथासंग्रह          ले - महादेव माने २ ) प्रकाश पेरणी - कवितासंग्रह         कवी - सुभाष कवडे ३ ) वसुंधरेचे शोधयात्री - संकीर्ण          ले - डॉ अनुराग  लव्हेकर ४)  कुणब्याची पोरं - कथासंग्रह           ले - आप्पासाहेब खोत ५ ) भैरवायन - कादंबरी            ल...

*एक सुविचार***************

*मूलतः देवदत्त निसर्गच मुक्त बेबंध आहे .नयनरम्य सुंदर प्रसन्न असा त्याचा सदैव समतोल सांधणारा आविष्कार आहे. हे सत्य आपण पाहतो आहोत.* *मी तर म्हणतो मग सात्विक , नैतिक विचारांना कशाला हवीत बंधने..?* *सर्वांनीच आपली नैतिक विचारधारा प्रामाणिकपणे विवेकाने जपत जगत रहावं त्यात खरे आत्मसुख आहे असं मला वाटतं..!* *अगदी मुक्तमोकळं कुणालाही न दुखवता जीवनात व्यक्त होत जगत रहावं..!* *हा निर्मोही संस्कार आहे तिथेच तर देवत्व , संतत्व प्रत्ययास येत असते.*  *आपल्या मनांतरात सर्वच प्राणिमात्रांच्या बाबतीत निर्मळ प्रीत, मैत्रभावनां जागृत ठेवून अगदी सहज प्रत्येकाच्या मनात राहण्याचा शाश्वत विचार करावा हेच सत्कर्म आहे.  हेच खरे संचित  आहे.* *आपलं जीवन जगताना , आपले सुखावणारे छंद जोपासताना आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून हवं तसं स्वान्तसुखाय जगत रहावं , तसंच ऋणानुबंधी नातीही , मैत्र सदैव जपत रहावित.* *सत्कर्माची सत्शील कास धरून जीवन अंगीकारताना हृदयस्थ विवेकी भावनांचे भान ठेवून स्वानंदे जगावं.* *कुणाला आवडो वा ना आवडो..!* मुक्त जगावं , मुक्त रहावं , मुक्त फिरावं , मुक्त चिंतनशील ...

*शीर्षक --वसुंधरा*

       सुप्रभा वेळी      मंद वाहतो वारा         सुगंध सारा        निसर्ग लिला       आरोग्य मंत्र खरा         जपावा जरा          बेधुंद धरा        सृष्टीचे वरदान           दिसते छान           हिरवा शालू        धरा नेसून आली           गंधित झाली            गोड सुंदर         दिसे धरा गोजिरी             वधू लाजिरी                 ✍️®©सुलभा भोसले    शिर्डी अहमदनगर

खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची अतिशय दूरावस्था.

पत्रकार कैलास घरत  खारपाडा पेण प्रतिनिधी खारपाडा गावाच्या पूर्वेकडील समर्थनगर लागून असलेल्या  खारपाडा सावरोली सर्व्हिस रोड ची दूरावस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खारपाडा पासून  10 ते 12 किलोमीटर वर असणाऱ्या ॲद्दिशनल पाताळगंगा एमआयडीसीमध्ये अनेक पुरुष आणि महिला कामगार या ठिकाणांहून  दररोज जातात त्यात अनेक वाहनांची वर्दळ असते.              खारपाडा ते चावणे गाव दरम्यान जवळजवळ 17 ते 18 मोऱ्यांची कामे केली परंतु मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डांबरीकरण केलेले नाही दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. वाहन चालक आणि चाकरमान्याना खड्यांचा सामना करीत जीव मुठीत घेवून गाड्या चालवाव्या लागतात. अनेक अपघात होत आहेत.  या खड्डामुळे अनेकांना कंबरदुखी, मानदुखी आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.             गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा लेखी तक्रार, पत्र व्यवहार दे...

नागपंचमी

पंचमीचा सण आला  चला बाई माहेराला  आला भाऊ न्यावयाला  बैलगाडी बसायला  पहिलवान माझा भाऊ  याला गं काय मागु  आयुष्य त्याला राहो  हेचं देवाजीला सांगु  बैलगाडी खुळू खुळु  सर्जा राजा संगतीला  बारा बिग्याची जमीन  माझ्या भावाच्या जोडीला  रानामध्ये जाऊ चला  नागोबाला पुजायला  वारुळाची करु पुजा  दुध लाह्या नैवेद्याला  झोका बांधु डहाळीला  भिडे उंच आभाळाला  गाऊ नाचु होऊ दंग  गाणी गात नागोबाला  माहेरच्या अंगणात  जमल्यात साऱ्याजणी  हितगुज करूयात  एकमेकी कानोकानी  सण नाग पंचमीचा  आला आनंद घेऊनी  एकमेकां टाळी देऊ  जमल्यात साऱ्याजणी   *शीला पाटील. चांदवड.*

विषय: " नागपंचमी

पावसाचा लपंडाव  खेळ खेळती सरी , सोन पिवळे ऊन  लकाके सर्व दूरवरी. ॥१॥ पहिला वहिला सण  श्रावणातला लय भारी , अशा उत्सवाची झुंबड  घेऊनी येई श्रावण खरोखरी.॥२॥ बळीराजा हा असे कैवारी , नाग राजाची मूर्ती  पुजुया मनोभावे घरोघरी .॥३॥ रुसला पर्जन्य राजा  मदत ना मिळे कोणाची, परी नागराजा तुच खरा सखा पाठ राखतो बळी राजाची.॥४॥ रक्षण करूया नाग राजाचे, जतन करूया अपुल्या निसर्गाचे. ॥५॥ कालीया नागास केले चारी मुंड्या चित, यमुना नदीपात्रातुनी श्रीकृष्ण वर आले सुरक्षित.॥६॥ श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर            सहाय्यक शिक्षक  मोहिते पाटील विद्यालय , मानखुर्द  मुंबई- ४०००४३. भ्रमण ध्वनी क्र.८१०८४६९६३५

*नागपंचमी निमित छोटासा लेख*

आपल्या भारत देशामध्ये वैविध्य जाती, धर्म, संप्रदाय आणि पंथाला माणनारी माणसं, आनंदाने मिळून मिसळून राहतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग होळी, दिवाळी, दसरा आणी त्याचप्रमाणे प्रत्येक सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. तसाच एक आपला पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण गावाप्रमाणेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रियामंडळी एकत्र येऊन जंगलात अथवा गावालगत असणाऱ्या वारुळाची पुजा करतात  आणि त्या वारुळाजवळ दूध ठेवल्या जाते. किंबहुना वारूळ हे वाळवी व मुंगीचे निवासस्थान आहे. आणि कधी कधी सापही आपला आसरा शोधतो आणि सुरक्षिततेसाठी वारुळात राहतो. पण जे दूध आपण वारुळासमोर सापाला पिण्यासाठी ठेवतो ते आता कुठेतरी थांबवले पाहिजे आणि टाळले पाहिजे. किंवा सापाला दूध पाजणे हे बंद केले पाहिजे. कारण मुळात दूध सापाचे खाद्य नाहीच आपण सापाला दूध पाजतो जे सापाचे पेय अन्न नाहीच. दुसरीकडे दूध पाजल्याने सापाच्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि तो लवकरच मरतो दूध ...