Skip to main content

*एक सुविचार***************

*मूलतः देवदत्त निसर्गच मुक्त बेबंध आहे .नयनरम्य सुंदर प्रसन्न असा त्याचा सदैव समतोल सांधणारा आविष्कार आहे. हे सत्य आपण पाहतो आहोत.*

*मी तर म्हणतो मग सात्विक , नैतिक विचारांना कशाला हवीत बंधने..?* *सर्वांनीच आपली नैतिक विचारधारा प्रामाणिकपणे विवेकाने जपत जगत रहावं त्यात खरे आत्मसुख आहे असं मला वाटतं..!*
*अगदी मुक्तमोकळं कुणालाही न दुखवता जीवनात व्यक्त होत जगत रहावं..!* *हा निर्मोही संस्कार आहे तिथेच तर देवत्व , संतत्व प्रत्ययास येत असते.* 

*आपल्या मनांतरात सर्वच प्राणिमात्रांच्या बाबतीत निर्मळ प्रीत, मैत्रभावनां जागृत ठेवून अगदी सहज प्रत्येकाच्या मनात राहण्याचा शाश्वत विचार करावा हेच सत्कर्म आहे.  हेच खरे संचित  आहे.*

*आपलं जीवन जगताना , आपले सुखावणारे छंद जोपासताना आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून हवं तसं स्वान्तसुखाय जगत रहावं , तसंच ऋणानुबंधी नातीही , मैत्र सदैव जपत रहावित.*

*सत्कर्माची सत्शील कास धरून जीवन अंगीकारताना हृदयस्थ विवेकी भावनांचे भान ठेवून स्वानंदे जगावं.*

*कुणाला आवडो वा ना आवडो..!*
मुक्त जगावं , मुक्त रहावं , मुक्त फिरावं , मुक्त चिंतनशील जीवनाचा रसास्वाद घ्यावा... मुक्त लिहावं.... गाणं गावं.... गुणगुणावं..  प्रत्येक क्षणी  तृप्त आणि मुक्त आनंदात " *हरफन मौला सारखे जगावं रहावं..!!!*

*पण हे असं जगणं फक्त , निरपेक्ष , निष्काम , निर्मळ, प्रामाणिक व्यक्तिमत्वाला साध्य होते. हे सत्य दृष्टांती वास्तव आहे.*

*जन्म मृत्यू हा एक सुंदरसा प्रवास आहे तो प्रत्येक जीवाला करावाच लागतो*

*प्रत्येक धर्मातील संस्कार आणि शिकवण ही मानव कल्याणकारी उपासनाच असते हे आपणच जाणले पाहिजे. त्या अनामिक , अदृश्य ,अगाध शक्तीवर विश्वास ठेवलाच पाहिजे.*
*प्रारब्ध , कर्म , कर्मभोग , सुखदुःख या गोष्टी अटळ आहेत. या बाबतीतचे अनेक दृष्टांत हे आजही सर्व प्राचीन अध्यात्मिक धर्मग्रंथातुन आढळतात.*

*त्याचे चिंतन , मनन , वाचन , पठण जर केले तर जीवनाची अर्थपूर्ण सत्यता जाणवल्या शिवाय रहात नाही. म्हणून जीवनाकडे अंतर्मुख होवून " असुया वृत्ती , द्वेष , तिरस्कार या भावनांचा " त्याग करून आपली वाटचाल सहृदयतेने करावी हेच आपल्या हाती असते.*

*भारतीय संस्कृती , ही सर्वधर्मीय संस्कार , धर्म , पंथ , ग्रंथ म्हणजे प्रणित असे विधायक मानवी संस्कृतीचे आद्यगुरू आहेत आणि ते सर्वच ग्रंथ सुजाण , सुसंस्कारित  माणूस घडवत असतात.* आणि त्यातूनच जीवनाची , *नैतिक जीवनमूल्ये प्रत्ययास येतात आणि " *इदं न मम* " *हा जीवनाचा गर्भित अर्थ कळून चुकतो.*

*मृत्यू हे जीवनातील अत्यन्त सुंदर सत्य आहे त्याची चिंता कशाला करायची . तो तर अटळ आहे*
मी तर म्हणतो ....
*माणसानं माणूस म्हणून निरपेक्ष जगावं , अपपर भाव त्यजावा , मनी परस्पर निःस्वार्थी प्रीतभाव जपावा. म्हणजे जीवनाच्या सत्यफलश्रुतीची अनुभूती येते आणि जन्म कृतार्थ होतो.*
"  *म्हणूनच जगतगुरु संत तुकाराम म्हणतात* ...
*ठेविले अनंते तैसेची रहावे ।। चित्ती असु द्यावे समाधान।।*

*तर ज्ञानेश्वरी माऊली आपल्या पसायदानात सर्व सृष्टीसाठी भगवंता जवळ प्रार्थना करतात की..* 
"  *जो जे वांछिल ते ते लाहो प्राणिजात* ।।

*तर राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी यांनी आपल्या मनाच्या श्लोकात....*
*  " *मना सज्जना भक्ती पंथास जावे* ।।
* *तरी श्रीहरि पाविजे तो स्वभावे* ।।
* *जनी निंद्य ते सर्व सोडुनी द्यावे* ।।
* *जनी वंद्य ते सर्व भावे करावे* ।।
* *असा उपदेश प.पू. समर्थ रामदास करतात.*

*( सदैव सत्कर्म करीत रहावे )*
*सर्वच संतांचे वाङ्मय हे सात्विक विचारांचे निरामय ,  निराकार* *अनामिक , अदृश्य अशा भगवंताचे , भक्तिभावाचे , श्रद्धेचे विधायक वैचारिक शब्दरूप आहे. त्यातून* *त्या सत्य विश्वात्म्याची प्रचिती येते.*
*त्यासाठी अगाध श्रद्धाभक्ती असणं महत्वाचं आहे.*
*जीवन क्षणभंगुर आहे* याची जाणीव असावी.

*या सृष्टीत भगवंता पेक्षाही आपल्या प.पू. जन्मदात्यांचं नातं हे सर्वात श्रेष्ठ असं नातं आहे. याची जाणीव असणं हीच आपल्या जन्मातील कृतज्ञ कृतार्थतेची खरी सांगता आहे.*
*आपल्याला भेटलेले गुरू , सद्गुरू हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक आहेत  ते आपले आहोभाग्य आहे.*
*उपकार कर्त्याच्या ऋणात रहावं त्याच कधी विस्मरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.*

" *येवो मृत्यू .. मी तर कुणाच्या ऋणात न रहाणारा मुक्तमस्त कलंदर..आहे !!  " तेंव्हा देवा मी तुझी दोन्ही बाहू पसरून वाट पहातो आहे . हा निःस्वार्थी सात्विक विचार जागृत ठेवून आपण प्रत्येक क्षण जगत रहावं..!!*"  *कधीच कुठल्याही बंधनात न रहाता स्वतःची अस्मिता सांभाळत आनंद देत, देत , आणि घेत , घेत प्रारब्धाच्या वास्तवाला अलवार झेलत मानवतेचा खरा वसा स्वीकारून प्रेमभावनां रुजवित जगावं.*
*जगत रहावं अस मला वाटतं .!!!* "
*इति लेखन सीमा*


*दिनांक:- 13 ऑगस्ट 2024*
*वि.ग.सातपुते (विगसा) पुणे*
*अध्यक्ष : महाकवी कालिदास प्रतिष्ठान*
*पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र )*
*( 9766544908 )*

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...