Skip to main content

*नागपंचमी निमित छोटासा लेख*


आपल्या भारत देशामध्ये वैविध्य जाती, धर्म, संप्रदाय आणि पंथाला माणनारी माणसं, आनंदाने मिळून मिसळून राहतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग होळी, दिवाळी, दसरा आणी त्याचप्रमाणे प्रत्येक सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. तसाच एक आपला पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण गावाप्रमाणेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रियामंडळी एकत्र येऊन जंगलात अथवा गावालगत असणाऱ्या वारुळाची पुजा करतात 
आणि त्या वारुळाजवळ दूध ठेवल्या जाते.
किंबहुना वारूळ हे वाळवी व मुंगीचे निवासस्थान आहे. आणि कधी कधी सापही आपला आसरा शोधतो आणि सुरक्षिततेसाठी वारुळात राहतो. पण जे दूध आपण वारुळासमोर सापाला पिण्यासाठी ठेवतो ते आता कुठेतरी थांबवले पाहिजे आणि टाळले पाहिजे. किंवा सापाला दूध पाजणे हे बंद केले पाहिजे. कारण मुळात दूध सापाचे खाद्य नाहीच आपण सापाला दूध पाजतो जे सापाचे पेय अन्न नाहीच. दुसरीकडे दूध पाजल्याने सापाच्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि तो लवकरच मरतो दूध सापांना पचत नाही, साप हा मांसाहारी जीव आहे. सापाचे सर्वात जास्त आवडते खाद्य हे उंदीर, बेडूक, पाल, कीटके आहेत. जे शेतातल्या पिकांची हानी करतात त्यांना साप खातो एकंदरीत साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. दूध हे सापांचे खाद्य नाहीच ही गोष्ट यापुढे लक्षात घेऊन सर्वप्रथम समाजात प्रचलित असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पप्रेमीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पमित्राने प्रयत्न केले पाहिजे. आज नागपंचमीच्या दिवशी आपण ठाम निर्णय घेऊ की आजपासून आपण जेथे सापाला वाचवण्यासाठी जाऊ तेथे गावातील लोकांना त्या ठिकाणच्या नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवू जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजणे बंद होईल. आणी कुठेही साप अथवा वन्यजीव प्राणी धोक्यात अथवा जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या वन्यजीव प्रेमेशी संपर्क साधून. त्या जीवाला जीवदान देण्याचे आवाहन देखील करण्यात यावे. 
कारण या पृथ्वीतलावावर प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणी प्रत्येक घटक हा निसर्गाचा भाग आहे सापाचे प्राण्याचे वन्यजीवाचे संरक्षण व्हावे हा उद्देश असलाच पाहिजे. दिवसेंदिवस सापांची वन्यजीवांची संख्या पर्यावरणास कमी होत आहे. आणि आपल्याकडे साप निघाला असता किंवा एखादा वन्यजीव आढळल्यास त्याला न मारता वन्यप्रेमींना बोलवून त्याला योग्य ठिकाणी त्याच्या अधिवासात मुक्त केले पाहिजे. म्हणजेच निसर्गातील समतोल ढासळता कामा नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे
प्रेम, करुणा, बंधुभावनेने कुणावरही विजय प्राप्त करता येते, जिंकता येते हे नागवंशीयांची नागपंचमी आपल्याला शिकवते धन्यवाद...

वन्यजीवरक्षक 
दुशांत शेळके
पगमार्क वाईल्ड लाईफ 
फाउंडेशन यवतमाळ

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...