Skip to main content

Posts

..... अखेर खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले

. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले, आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमंलबजावणी साठी मार्ग मोकळा झाला.आता एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता मंत्रालयातून थेट जीआर (परिपत्रक) काढण्यास काही ही अडचण राहिलेली नाही.सकल धनगर जमातीच्या वतीने पुणे येथे अधिवेशन, जेजुरी ते पंढरपूर जागर यात्रा,९ सप्टेंबर २०२४ पासून पंढरपूर येथे आपले सहा उपोषण करणारे मल्हार यौध्दे,१६ दिवसाचे उपोषण संपून छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालया बाहेर गणेश केसकर व योगेश धरम यांनी उपोषण करुन खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.या दरम्यान महाराष्ट्र विविध ठिकाणी उपोषण, लाक्षणिक उपोषण, रास्ता रोको, निवेदने देणे,टायर जाळून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्या बरोबर घेऊन आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन धनगर समाज बांधवांनी व भगिनी केली.या सर्वांच्या परिश्रमाने छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.यामुळे धनगर समा...

मुंबई आझाद मैदानात सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे यांचे आमरण उपोषण

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  सकल धनगर जमात, महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई आझाद मैदानात धनगर समाजाच्या सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या महिला कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 5 आक्टोंबर 2024 पासून धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.काम जुनेच पण नव्या दमाने करायचे,ना नेता ना पक्ष एसटी आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष या सकल धनगर जमातीच्या उद्देशाने प्रेरित होऊन सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यांनी सर्व समाजातील पुरुष व महिला यांना आवाहन केले आहे की," मी आपल्या समाजासाठी मरायला तयार झाले आहे, समाज बंधु भगिनींनो तुम्ही एकत्र या" धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता वरचेवर आक्रमक होत आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने चालू आहेत.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 15 दिवसांची दिलेली मुदत संपून गेली, डॉ.सुधाकर शिंदे यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.त्यात आदीवासी समाजाचे आमदार खासदार धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करु नये म्हणून आक्रमक झाले आहेत.मंत्रालयाच्या संरक्षण जाळीत उड्या ...

*भिडेवाडा कविसंमेलनाला उदंड प्रतिसाद*

पिंपरी (दिनांक : ३० सप्टेंबर २०२४) भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतर राष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय पिंपरी - चिंचवड विभागाचे कविसंमेलन पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात रविवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाले. या कविसंमेलनास रसिक आणि कवी यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कवींनी देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपल्या अतिशय सुंदर, वैविध्यपूर्ण, प्रबोधनपर रचना सादर केल्या. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडयात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, घराघरात पोहोचावा या एकमेव उद्देशाने भिडेवाडा काव्य जागर अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या जिल्हास्तरीय कविसंमेलनांचे आयोजन आणि नियोजन करण्यात येणार आहे, असे या अभियानाचे जनक आयोजक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.  या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  कांचन मून, अशोक सोनवणे, मेहमूदा शेख, प्रति...

*नाभिक समाजाचे ३०रोजी महाधरणे आंदोलन*

पुणे..नाभिक समाजासाठी संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करा,या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सकल नाभिक समाज दिनांक ३०सप्टेबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नाभिक महिला अध्यक्ष सौ सुवर्णा सौदागर वाघमारे साहित्यिक प्रबोधनकार पत्रकार यांनी दिली  सकल महिलांचा पाठींबा महाराष्ट्र राज्य नाभिक महिला सेना पुणे ,व महाराष्ट्र राज्य नाभिक सेना उप अध्यक्ष नवनाथ भाऊ गायकवाड यांचा मार्गदर्शनने आयोजीत सहभाग घेऊन पाठींबा निवेदन देण्यात आले. समाजाचा हिताची व हक्कांची मागणी म्हणून जास्तीत जास्त महिलांनी सुध्दा संपर्क साधून सहभागी व्हावे .

नेवासा येथील उपोषणाला बसलेल्या दोन समाज बांधवांनी घेतली प्रवरा नदीत उडी.

नेवासा येथील उपोषणाला बसलेल्या दोन समाज बांधवांनी घेतली प्रवरा नदीत उडी. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता नेवासा येथे उपोषणाला बसलेले सहा उपोषण कर्त्या पैकी प्रल्हाद सोरमारे,व बाळासाहेब कोळसे यांनी प्रशासन उपोषणा कडे लक्ष देत नाही म्हणून प्रवरा नदी मध्ये उडी घेतली.तेथील धनगर समाज बांधवांनी त्यांचे शोध कार्य चालू ठेवले आहे.तमाम धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी यावे असे आवाहन तेथील धनगर समाज बांधव करीत आहेत.