Skip to main content

Posts

*ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड*

ग्रामीण हास्य कवी  म्हणून प्रसिद्ध असणारे ग्रामीण कवी श्रीराम विध्यासागर घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या *भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या "महाराष्ट्र राज्य समन्वयक" पदी      नुकतीच निवडकरण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, काव्यक्षेत्राची तसेच शेती मातीची जाण असणारे ,शेतकरी पुत्र ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन आपला सांस्कृतिक वसा आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे ,एकदम सोप्या शब्दात सर्वांना आपलेसे करणारे आणि आपल्या काव्यातून श्रोत्यांना खळखळून हसवणारे ग्रामीण हास्य कवी अशी महाराष्ट्र भर ओळख निर्माण करणारे ग्रामीण कवी , गीतकार, निर्माता अशा अनेक भूमिका निभावणारे तसेच स्वतः च्या आणि कवी आणि कवयित्री यांच्या कवितेला संगीत बद्ध करून सर्वांचे मनोरंजन करणारे कवी श्रीराम घडे सर यांची साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आवड पाहून, साहित्य क्षेत्रातीलविविध समस्या सोडवण्यासाठी , समूहासाठी वेळोवेळी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून त्यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या "महाराष्ट्र राज्य समन्वयक" प...

अंगुलिमाल उराडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा"हे विश्व शब्दांचे" या नावातच व्यापकता

सुनील शिरपुरे/यवतमाळ चंद्रपूर:-१ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा "हे विश्व शब्दांचे" हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे.             या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात "हे विश्व शब्दांचे" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श...

*५० तास अखंड वाचन यज्ञात झाला,**आगरी बोली कवितांचा जागर*

 प्रतिनिधी / कल्याण           आगरी बोलीतील कवितांची गोडी आज कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा कार्यक्रम. यावेळी आगरी कवींनी विविध आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.           आगरी कवितांचा हा कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला. यात कविता, चारोळ्या, पारंपारिक गीते, लग्न गीते, धवला असे आगरी साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यात आले. या कवी संमेलनात कवितांना पार्श्वसंगीत देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासाठी संगीत संयोजक 'आपला बंड्या' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील सर, प्रसिद्ध साहित्यिक अनंत शिसवे, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण पन्नास तासांच्या सत्रात कविता वाचन, कथाकथन, अभिवाचन असे सत्र सुरु होते.         या संपूर्ण कार्यक्रमा...

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन भारत कवितके....

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.   ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी कळविले आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, पुणे जवळील वाफगाव किल्ले या ठिकाणी ३डिसेंबर १७७६ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला, त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी होळकर होते,आईचे नाव यमुनाबाई होते, यमुनाबाई या तुकोजी होळकर यांच्या दासी होत्या.काशिराव, मल्हारराव, आणि विठोजीराव हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू.६जानेवारी १८०५ साली राज्याभिषेक सोहळा करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.महाराजा यशवंतराव होळकर हे एक कर्तबगार वीर पुरुष होते.भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,संकटाची वादळे, युध्दाचा सतत झंझावात,सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवून...

चंद्रपूर मधील जांब (बुज) येथील अंगुलिमाल उराडे यांचा पुण्यात सन्मान

संस्थापक सागर भाऊ वाघमारे, अध्यक्षा पिंकीताई सागर भाऊ वाघमारे यांच्या युवा प्रबोधन साहित्य मंच पुणे महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा येथील सौ. पुष्पावती दशरथ बहुले सभागृह, नाना - नानी पार्क तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण व कवी संमेलन रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या सोहळ्यामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील जांब (बुज) या खेडेगावात वास्तव्याला असलेले लेखक, कवी, सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना "युवा महाराष्ट्र आदर्श समाज भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ.अमरजी चौरे, स्वागताध्यक्ष श्री.संजय कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शक मा.देवीलाल रौराळे अमरावती, मा.नितीन सुर्यवंशी, मा.हरेशभाई देखणे (डायरेक्टर), व्याख्याते प्रा.संपत गारगोटे, मा.आरोही हिवरकर अभिनेत्री, मा.रेखा गायकवाड अभिनेत्री, श्री.क्रांतीनाना मळेगांवकर (फेम न्यू होम मिनिस्टर), हेमंत थोरात (सिने निर्माता), निलेश चौधरी (युवा उद्योजक) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार ...

पंढरपूर बस स्थानकात मोकाट गाई गुरे आणि खाजगी वाहनांचा सुळसुळाट

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर बस स्थानकात सातत्याने मोकाट गाई गुरे वावरताना दिसतात आणि खाजगी वाहने अस्ताव्यस्त लावलेली दिसतात.या मुळे प्रवाशी वर्ग,बस चालक वाहक यांना विनाकारण त्रास होऊन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.पंढरपूर तिर्थक्षेत्र असलेले ठिकाण असून येथे बारा महिने विठ्ठल भक्त, वारकरी येतात, साहजिकच या ठिकाणी सातत्याने गर्दी च गर्दी दिसून येते.या बस स्थानकात आणि आवारात मोकाट गाई गुरे आणि रिक्षा,चोर व्हिलर, अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात.काही रिक्षा वाले तर रिक्षा प्रवाशांना शेड च्या एकदम जवळ घेऊन जातात.मोकाट गाई गुरे येथे इकडून तिकडे फिरत असतात शोच, मल मूत्र सोडतात, सर्वत्र दुर्गंधी पसरते,डासाचा प्रादुर्भाव होऊन मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरतात.अनेक प्रवाशी मलमुत्र शौच मध्ये घसरुन पडतात.एकंदरीत या समस्ये कडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देऊन मोकाट गाई गुरे कुत्री, आणि खाजगी वाहने यावर नियंत्रण ठेवावे.व प्रवाशी,बस चालक, यांना या समस्येतून मुक्तता करावी.

दर्जेदार कवितांनी संध्याकाळ बहरली.साहित्य सम्राट पुणे आणि करिअर सिद्धी हॉबी होम हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानाने १९५ वे कवी संमेलन प्राध्यापिका आशादेवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कवी बंडा जोशी उपस्थित होते

. साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी ग्रीन एरिया बी बिल्डिंग, शिंदे वस्ती हडपसर येथे आयोजित केले होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करियर सिद्धीच्या संचालिका माधुरी चिदरवार यांनी केले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कुमारी श्रेया मराठी आणि मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.  एका पेक्षा एक अशा दर्जेदार मराठी हिंदी गझल कविता आणि गीतांनी सजलेली काव्य मैफिल रसिकांनी अनुभवली. या कवी संमेलनामध्ये  सौरभ मराठे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, छगन वाघचौरे, राहुल जाधव, प्रल्हाद शिंदे, आशादेवी, दिपाली सहा, सविता गोकुळे, कल्याण इंदलकर, बंडा जोशी, पंडित मधुर, उद्धव महाजन, बाबासाहेब जाधव, राहुल भोसले, आनंद महाजन, गायत्री मराठी, श्रेया मराठी, माधुरी चिदरवार , संदीप चिदरवार इत्यादी कवी कवयित्री यांनी आपल्या दर्जेदार काव्यरचना सादर करून काव्य रसिकांची संध्याकाळ अविस्मरणीय केली.  रसिकांनी अशी कवी संमेलने पुन्हा पुन्हा घेण्याची मागणी केली.  कवी संमेलनाचे  नाविन्यपूर्ण सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर उत्कृष्ट आभार आनंद महाजन सरांनी व्यक्त ...