Skip to main content

Posts

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ  महामानवांनी केलेले कष्ट, त्याग आणि दिलेले परिवर्तनवादी विचार साहित्यातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कवींनी आणि गायकांनी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांतून आपल्या कविता आणि गीतातून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे अध्यक्षीय भाषणात कवी विनोद अष्टुळ यांनी आपले मत व्यक्त केले.  महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सव २०२५ मध्ये रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन वाडिया कॉलेज समोर पुणे येथे संपन्न झाले.  हे साहित्य सम्राटचे १९९ वे कवी संमेलन होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.  विचारपीठावर स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, विशेष अतिथी मा.रवींद्रअण्णा माळवदकर, ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे, तुकाराम डावरे रा.अध्यक्ष केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली, संमेलन अध्यक्ष विनोद अष्टुळ,  आणि मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.  कवी आणि संम...

*समीक्षण*. काव्य संग्रह:- कव्यमालाकवी:- धनजंय इंगळेपृष्ठ:- ६४किंमत:- ११० रुपयेप्रकाशन:- वारकरी प्रकाशनमुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारीप्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५

काव्य संग्रह:- कव्यमाला कवी:- धनजंय इंगळे पृष्ठ:- ६४ किंमत:- ११० रुपये प्रकाशन:- वारकरी प्रकाशन मुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारी प्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५           हातात पुस्तक पडताच त्याचा सुगंध मनाला मोहवून गेला.काव्याच्या एका एका पुष्पाने ही काव्यमाला अलगद शब्द रूपाने गुंफली गेली.शब्दमोती किती अनमोल असतात हे आपणास ठावूक आहेच.सोन्यापेक्षा ही याचे मोल अनमोल आहे.काव्यसंग्रहाच्या अंतरंगात एकूण ५२ कविता व मल पृष्ठावर एक अशा एकूण ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत.प्रत्येक काव्याचा ढंग हा आगळा वेगळा आहे.         काव्य संग्रहाला संपादक,गीतकार,साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.सुवर्ण अनुभवांची गुंफण म्हणजेच काव्यमाला..असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला.भवनाचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य असते असे माझे तरी म्हणणे आहे.एखादी भावना मनात उत्पन्न झाली की,ती काव्याच्या रूपाने अलगद प्रसूत होते...एक एक मोती अचूक हेरला आणि त्याला गुंफले जाते,तेव्हा आपलेच अपत्य आपल्याला कुरवळतांना किती आनंद होतो.स्व निर्मिती मनाला नवीन ऊर्जा देवून ...