Skip to main content

Posts

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे जे रुग्णालयात प्रमुख अतिथी म्हणून सौ. वर्षा वराडे यांचा सन्मान

जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा  ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या  जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.  बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ.  अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा,  काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ.  सापळे आणि विशेष अतिथी,  श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून  आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टा...

आपली सुरक्षा

 करू स्वतःचं सुरक्षा  धडे घेऊ आत्मरक्षा  कमवु शरीर यष्टी  तत्पर असूत रक्षा. सोबत इतरांचीहि  घेऊ काळजी सारीच  दृष्ट्रावर पडु भारी  मित्र मैत्रीत यारीच. लढायची ती तयारी  एक राहू सारी जन  सु राष्ट्र करू निर्माण  ठेवुत शांतीचं मन. वसाच सुविचारांचा  निर्माण करू माणसा  साथ देऊ दिन दुःखी  झोडपू दृष्ट दिवसा. शक्ति करू बळकट  हात घेऊन हातात  वार करतं पोटात  वावरू सारी थाटात.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन व पोलीस यांचा वचक राहिला नाही... पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली

सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.संतोष देशमुख निघृण हत्या, कैलास बोराडे यांच्या शरीरावर दिलेल लोखंडी रॉड चे चटके, स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अन्याय, वगैरे वगैरे घटनांनी लोक हादरलेले आहेत,अशा घटना म्हणजे राज्याला एक प्रकारे लागलेला कलंक आहे,या घटनेतील काही आरोपी पोलिसांना अजून सापडलेले नाहीत,ही अत्यंत खेदाची बाब आहे, अन्याय झालेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे ,यांचा विचार न करता ती एक व्यक्ती आहे,यांची जाणीव ठेवावी.माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संवेदनशील मनाचा थरकाप उडविते, ज्या समाजातील व्यक्ती वर अशा प्रकारे अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने त्याचा समाज उभा राहून न्याय मागत असेल तर बिघडले कुठे? पोलीस व शासन यांनी यांना आवर नाही घातला तर ते आणखी निर्भिड,बेडर होऊन दुसरे गुन्हे करतील.अशा गुन्हेगारांना वेळी च अटक करुन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,

काव्य दरबार उरण.. पोपटी कवी संमेलन

   नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार      काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक-  श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.      सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली.        व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्...

कृषकाच्या अंतरीची व्यथा मांडणारा काव्यसंग्रह: रूमणं

            ग्रामजीवनातून वर आलेले आणि ग्रामीणतेशी जवळीक असणारे अनेक साहित्यिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामजीवनाचे सर्वांग सुंदर  चित्र रेखाटताना  आढळतात. त्यातीलच एक उदयोन्मुख कवी श्रीराम घडे यांचा नामोल्लेख करावा लागेल मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या आणि त्या लोकप्रिय ही झाल्या विशेषता ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे .याच परंपरेचे समृद्धीकरण  करणारी साहित्यिकांची नवी पिढी  साहित्याच्या क्षेत्रात आश्वासक साहित्य निर्मितीचे कार्य   करीत आहेत .आणि त्यांच्या साहित्याचा वाचक वर्ग ही गुण दोषा सहित स्वीकार करतात .अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार खेडयापाड्यातही झपाट्याने झाला आणि खेड्यातल्या खेडूत माणसाच्या जगण्याचे चित्र बदलू लागले .अनेक खेड्यातील सुशिक्षितांची पिढी शहराकडे धाव घेऊ लागली  नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असणारी  ही सुशिक्षित पिढी  खेड्यातील जनजीवन  ,शेत -शिवार ,गुरंढोरं , पेरणी, कुळवणी ,नांगरली ,काढणी मळणी , ख...

मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री,लेखिका हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित....

डोंबिवलीतील नामांकित  डॉन बॉस्को शाळेतर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री,लेखिका  हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले.  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेनी ब्राईट  ,शाळेच्या मराठी  वाङ्मय मंडळाचे प्रमुख श्री.पद्माकर भावे सर, यांच्या नियोजनाखाली शाळेतील मुलांकडून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या,नृत्य,गायन,नाटुकली,काव्यवाचन,अशा विविध कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराष्ट्र गीत सादर करून झाली. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन  छोट्या मुलांनीच केले. या सर्व लहान मुलांचे कौशल्य बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या... आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी.... सौ.मेघा पोतनीस मॅडम,सौ.ज्योती माटे मॅडम,धनश्री मॅडम,वैशाली मॅडम  तसेच इतर सर्व शिक्षिकांच्या सहकार्याने कार्यक्रम दणक्यात पार पडला.

चेंबूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  चेंबूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे संघाचे अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर यांनी कळविले आहे, रविवार दिनांक २मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत चेंबूर पूर्व येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर मुंबई ७१ या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई यांच्या २० वर्धापनदिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी,स्व.शिवाजीराव ( बापू) शेंडगे यांची पुण्यतिथी,समाज बंधु भगिनी साठी स्नेहसंमेलन सोहळा, वधुवर सूचक पालक परिचय मेळावा, शब्द जादूगार प्रा.डाॅ.सुनील रुपचंद धनगर यांचे व्याख्यान, मान्यवरांचे स्वागत व सत्कार,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, प्रमुख पाहुणे क्रीडा आणि अल्प संख्याक विकास मंत्री आणि प्रमुख अतिथी आमदार नारायण आबा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तमराव जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, पुण्यश...