Skip to main content

काव्य दरबार उरण.. पोपटी कवी संमेलन

 
 नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार     
काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक-  श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.
     सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली. 
      व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन झाले. आणि कवी/गायक अरुण द म्हात्रे यांनी सुरेल आवाजात गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. एम्. मढवी साहेब यांनी केले. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर आणि उपस्थितांच्या हस्ते पोपटीचे पूजन सुव्यवस्थित केले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी काव्य दरबारचे सक्रिय कार्यकर्ते श्री हरिश्चंद्र माळी यांच्या जन्मदिनानिमित्त शाल/पुष्पगुच्छ आणि कौतुक प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. प्रमाणपत्राचे वाचन कवी रामचंद्र म्हात्रे यांनी केले. कविश्री अरुण द. म्हात्रे. यांना "जगदंब" पुरस्कार प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार शाल/पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय- रवीशेठ पाटील साहेब यांनी आपल्या मोजक्या शब्दात कवी संमेलन, कवी आणि कवींच्या कविता याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन करून साई मंदिर वहाळ येथे खूप मोठे कवी संमेलन भरवण्याबाबत इच्छा प्रकट केली.
        यानंतर पोपटीचा आस्वाद घेण्यात आला. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी निवेदन करून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थीना पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर आगरी भाकरी-भात-मटन अशा रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. काही शाकाहारींची सोय करण्यात आली होती. याबाबत के. एम्. मढवी आणि त्यांच्या परिवाराचा मोलाचा आणि मोठा वाटा आहे. सर्वांचे भोजन उरकल्यानंतर जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त आदरणीय भूषण पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कवी कवयित्रींचे कवी संमेलन घेण्यात आले. सु-नियंत्रित सूत्रसंचालन अरुण द. म्हात्रे, रेशमा ठाकूर व सुचित्रा कुंचमवार यांनी केले. यामध्ये अंदाजे ३५ कवी/ कवयित्रींनी वेगवेगळ्या विषयांच्या बहारदार रचना सादर केल्या. 
अध्यक्षीय मनोगतात भूषण पाटील साहेब यांनी साहित्याची गोडी काय असते? तसेच कवींच्या कवितेत किती ताकद असते? तसेच भविष्यात आपण सर्वांनी किती सतर्क आणि कसे जागृत राहायला हवे? याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन अगदी सोप्या शब्दांत केले. त्यानंतर मीनल माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
         शेवटी कवी/गायक अरुण द. म्हात्रे. यांच्या सुरेल आवाजात आणि पूर्ण शांततामय वातावरणात पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
अशाप्रकारे सदर पोपटी कवी संमेलन सु-नियोजनाने, वेळेत आणि आनंदात पार पडले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...