Skip to main content

*पाठय पुस्तक कवी हनुमंत चांदगुडे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दिनांक 03ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या भेटीला*

बाल विद्यार्थी हे 'शाळेमध्ये भाषा विषयाच्या पाठपुस्तकातील धडा अथवा कविता शिकत असताना त्यांच्या समोर त्या धड्याचे लेखक अथवा कवी नेहमीच प्रेरणा स्रोत असतात. 'ही कविता किंवा धडा लिहताना त्या लेखकांला का सुचला असावा'... त्या मागे त्याची काय पार्श्वभूमी असेल...? असा प्रश्न अनेक वेळी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू बालमनाला पडत असतो, ती जिज्ञासा पूर्ण व्हावी व  "जर विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं तर आजचा आपल्यातील विद्यार्थी उद्याचा पाठयपुस्तक  कवी-लेखक व गीतकार होऊ शकतो" याची जाणीव विद्यार्थांना करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी   महाराज विद्यालतात *पाठयपुस्तक कवी/लेखक आपल्या भेटीला या सदराखाली* 
इयत्ता आठवीमधील *मराठी विषयाच्या *आळाशी कवितेचे* कवी,सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार *हनुमंत चांदगुडे* हे प्रत्येक्षात दिनांक:03 ऑगस्ट 2024. वार : शनिवारी सकाळी ठीक 10:00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय राणीसावरगाव येथे येणार असून त्यांच्या सोबत दुसरे पाठपुस्तक *कवी श्रीराम घडे* सुप्रसिद्ध कवी *प्रमोद घोरपडे (कांतासूत)* हे पण येणार असून *ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी लिहलेलं* ग्रामीण शेतकरी जीवनावरआधारित *रूमन* या कविता संग्राहाच *पुस्तक प्रकाशन* पण होणार आहे. या कार्यकमाच्या निमित्ताने आपल्या शाळेतील व 'परिसरातील शाळेतील' विद्यार्थ्यांच्या सुप्त साहित्यिक कला गुणांना वाव मिळावा म्हणून छत्रपती विद्यालयाच्या वतीने  गावातील सर्व शाळेला भेटी देऊन आपल्या विद्यालयातील बाल कविना कविता लिहायला सांगा व त्या कवितेचे सादरीकरण सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या समोर केले जाईल व जे विद्यार्थी यात प्रथम येथील त्याचा पुणे येथे सन्मान चिन्ह बक्षीस देऊन गौरव करण्यात येईल असे सांगितले असून यात *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील विद्यार्थी* व *छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी* सहभाग नोंदवला आहे. तरी परिसरातील सर्व साहित्य प्रेमी, विद्यार्थी पालक बंधू भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आव्हाण शाळेच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री गनाचार्य स्वामी मॅडम, उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री व्यँकट कदम सर यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख केशव हाके सर,हॉस्टेल अधीक्षक बंडेवाड सर मराठी विषय शिक्षिका सौ.तापडिया मॅडम, अंधुरे मॅडम,सालमोटे सर,राठोड सर, यमगीर सर, कांबळे मॅडम,क्षीरसागर सर,पडोळे सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...