Skip to main content

*डॉ खंडू माळवे(खं र माळवे -खरमा)यांना जीवनगौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्राप्त*

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे -खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला.ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे देण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भुषविले उदघाटक मां प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे -खरमा यांचेहस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उदेशिकेचे वाचन केले यावेळी रविवार दि २५/०८/२४रोजी प्रमुख पाहुणे म्हणून नासा शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजल्स पद्मश्री डॉ जी.डी.यादव(अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार दै प्रहार संपादक सुकृत खांडेकर बी.पी.ई.हायस्कुल बांद्रा मुख्याध्यापक भानुदास केसरे नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडक, उद्योजक राजेश कांबळे आणि वूमेन्स इंडिपेंडेड फोरएहरच्या संस्थापिका डॉ नॅन्सी अलबुकर्क रामकृष्ण कोळवणकर उपस्थिती लाभली यावेळेस डॉ खं र माळवे -खरमा यांना साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कार तसेच निमशासकीय पुरस्कार यादी प्राप्त आहे नुकताच साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व फेमगौरव पत्र, स्मरणिका,अधिक विषेशांक कवी सरकार विलास पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे एकूण शंभर पुस्तके लिखित एकाच वेळी प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे या अगोदर महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाने काव्यसंग्रह "चाळणीवाला"२०१३ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्रीमंडळ यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले आजवर ५००० पाचहजार कविता (मराठी हिंदी) लिहून वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड,OMG बुक ऑफ रेकॉर्ड,भारत बुक ऑफ रेकॉर्ड, हिंदूस्थान बुक ऑफ रेकॉर्ड, सर्वोच्च गिणिज बुक ऑफ रेकॉर्ड करण्याचा मानस आहे या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने डाक विभाग पाच रूपयांचे स्टॅम्प टिकिट जारी केले २०१५आजवर गीत,लावणी,शाहिरी पोवाडे, बालगीते,प्रेमविरापासून तेसंतसाहित्यापर्यंत सामावेश आहे त्याचप्रमाणे बालगीत "अंगाईत" प्रकाशित आहे बाळासाहेब बेल्हेकर तमाशा मंडळ गीत लावणी गात आहेत हा पुरस्कार माझा नसुन सर्व चाहते वर्ग व साहित्यिक कवी संपादक यांचा आहे असे डॉ खं र माळवे यांचे मत आहे त्यांनी आजवर हिंदी मराठी इंग्रजी साहित्यात त्यांचें अनमोल असे विचार मांडून समाजप्रबोधन करीत आपल्या जल्मभूमि कर्मभूमीत आणि महाराष्ट्राच्या मातीत आपल्या विचाराने देशाच्या जडणघडणीत सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आपल्या कर्मभूमीत आपण विविध विषयांवर लेखन करून तळागाळातील जनतेशी नाळ जोडून समाजाच्या विविध पैलूचा ग्रामीण जीवनातील शैलीचा मागोवा घेत समाज परिवर्तनासाठी आपण जी का जपली आहे या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती सदस्य प्रा नागेश हुलवळे, रमेश पाटील व प्रमोद सुर्यवंशी ,योगेश हरणे,यांनी केले तर सुत्रसंचलन योगीता पावले यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली
प्रेस नोट

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...