Skip to main content

*देशभक्ती...*

 

उद्या 15 ऑगस्ट...दिवसभर नदीला  पूर यावा तसे सगळीकडून देशभक्तीचे मेसेज एकामागून एक सर्वांना येत राहणार..कोण चौकात गाणे वाजवणार, कोण पूजा ठेवणार , कोण गाड्यावरून,सायकल वरून झेंडे मिरवणार...यात वाईट असे काहीच नाही. उलट आजही आपली देशभक्ती प्रत्येकात शाबूत आहे याचे हे उदाहरण आहे. 
पण हीच देशभक्ती आपल्या रोजच्या वागण्यात का? येत नाही ...जेव्हा देशात आतंकवादी हल्ला होतो तेव्हा सगळा देश संतापात शोकात असतो, सगळी यंत्रणा अचानक जागी होते.. कोणाला तरी पकडले जाते..पण हल्ला यशस्वी झाला म्हणजे त्यांचे काम फत्ते झाले असे होते.त्यांना मरणाची भीती नसते..कारण त्यांचा ब्रेन आधीच वॉश केलेला असतो...आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे याची त्यांना त्यांच्या आका ने हमी दिलेली असते (त्यांच्या भावनेचा,गरिबी अन् अशिक्षिपणाचा फायदा घेत).
अशावेळी जे कोणी बाहेरच्या देशातून आतंकवादी येतात  तेव्हा ते एकटे काही करू शकत नाही जो पर्यंत त्यांना आपल्या देशांतून कोणी मदत /सपोर्ट करत नाही..यांची मदत करणारी यंत्रणा शोधून वेळीच ठेचून काढली पाहिजे.. प्रत्येक गल्लीतील,गावातील, चाळीतील,इमारतीतील नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे..,सर्वांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करणे,आपल्या आजूबाजूला कोणी अनोळखी लोक राहत असतील तर त्यांच्या  संदिग्ध  हालचालीवर  नजर ठेवून माहिती देणे ही सुद्धा देशभक्ती आहे...
त्याचप्रमाणे आपल्या आया बहिणी रात्री अपरात्री  एसटी स्टँड,गावात,शहरात,चौकात,बाजारात इ.कुठे अडकलेल्या असतील तर  त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, महिलांचे रक्षण करणे, वृध्द लोकांची मदत करणे ही एकप्रकारची देशभक्तीच आहे...
जसं सीमेवर जावून लढणे म्हणजे देशभक्ती आहे तशी देशात राहून देशाची सेवा करणे ही सुद्धा देशभक्ती आहे. त्यामुळे देशभक्तीची व्याप्ती फार मोठी आहे...
 मिळालेली निवडणूक कर्तव्य पार पाडणे, संकटात लोकांची सेवा करणे,मदत करणे ही देशभक्तीच आहे.
तसेच आपण करत असलेल्या व्यवसायातून,जॉब मधून,कामातून,घरातून लोकांसाठी काही उपयोगी कार्य होत असेल तर तीही देशभक्ती आहे. एखाद्या फळ विक्रेत्याने आवाच्या सव्वा ( हे प्रामुख्याने शहरात मुंबई/पुणे येथे घडतात) किंमती न लावता  योग्य दराने फळांची विक्री केली ,तरी ही तो एक प्रकारे लोकांचा फायदा होतो म्हणजे ही सुद्धा त्याच्या हातून घडलेली लोकसेवाच आहे. विद्यार्थांना परीक्षा काळात उशीर होत असल्यास मदत करणे हे सुद्धा देशाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे...अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण देशभक्ती  साध्य करू शकतो आणि देशाला समृध्द बनवू शकतो...
"प्रजा सुखी तर देश सुखी.." या उक्ती प्रमाणे 
प्रत्येकाने आपल्या हातून होईल तशी जनतेची सेवा करा,मदत करा म्हणजे देशातील अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि  यश गाठता येईल पर्यायाने आपला भारत देश खऱ्या अर्थाने एक महासत्ता होईल...

✍️©️अविनाश ठाकूर
            डोंबिवली
संपर्क : 8104956367 

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...