स्वातंत्र्यासाठी दिनरात
लढले वीर जवान सारे
वीरांच्या बलिदानाने घुमती
लोकशाहीचे अखंड वारे....१
मी नवयुवक भारताचा
अखंडित ऋण स्मरतो
देशाचा विकास करण्या
जागतिकीकरणाचा मार्ग चालतो....२
देशप्रेम, संस्कार शिदोरी
तरुणाईच्या मनात रुजते
कला,क्रीडा क्षेत्राची भरारी
देशाच्या मुकुटावर सजते.....३
ज्ञानविज्ञान क्रांतीने दाखवले
उत्कर्षाचे मार्ग अनेक
सर्वांगीण विकासाचे
शिलेदार आहोत हरेक..४
स्वाभिमानी देशभक्ती,
एकता भारताचे भूषण
अवकाशात घेतो भरारी
परिवर्तनाचे लेवून आभूषण....५
✍️सौ जयश्री पंकज बोरसे कल्याण
Comments
Post a Comment