Skip to main content

नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार - २०२४ सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न



 प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता  विविध क्षेत्रतील मानवरांना  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ' उद्घाटक  साहित्यिक आणि उपाध्यक्ष सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य  डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . बी. पी . ई . हायस्कूल बान्द्रा या मुलींनी स्वागत गीत सादर केले .  स्वागताध्यक्ष आणि  कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि  त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले .  आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी  यादव डॉ डेरिक एंजल्स ' डॉ सुकृत खांडेकर ' श्री भानुदास केसरे ' प्रमोद महाडीक ' रामकृष्ण कोळवणकर ' राजीव कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत होते . यावेळी नवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमात साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता, संपादकीय,, ' वैद्यकीय, कला , नाटय , नवोदित  अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८७ हून अधिक मान्यवरांना  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .अक्षरश्री विलास देवळेकर यांनी नावावरुन कविता फ्लॅक्सने, पुरस्कार्थींचे लक्ष वेधून घेत होते. आणि बऱ्याच जणांनी त्या कवितेसोबत फोटोही काढले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा ही वाढली. या कार्यकमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी ' पी .बी ई सोसायटी नाईट शाळा  ' वर्ल्ड व्हिजन संस्था , लेखक रमेश पाटील ' प्रमोद सुर्यवंशी योगेश हरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते . योगिता पाखले,योगेश गोतरणे, वैशाली पाखले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट  सूत्रसंचालन केले .

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...