पुणे:- गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २४ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे क्रांती दिनानिमित्त उत्साहात बालसभा पार पडली.इयत्ता सहावीच्या वर्गाकडे या सभेचे नियोजन होते.सभेचे अध्यक्षस्थान ६ वी अ मधील शिवम कांबळे ने स्वीकारले,तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.संगीता गुरव मॅडम या होत्या.तु बुध्दी दे या प्रार्थनेने सुरुवात करून सर्व बालसभा सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा प्रज्वलन झाले.६ वी मधील विद्यार्थ्यांनी स्वागतम् शुभ स्वागतम् हे स्वागत गीत सादर केले.संस्थेचे संस्थापक माननीय दाभाडे सर,प्राचार्या सौ.वाळुंज मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षिका सौ.घावटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ६ वी ब मधील रूद्र कदम ने केले तर निवेदन ६ वी अ मधील दिपल पाटील व मीरा मगर यांनी केले. "थोर क्रांतिकारक" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे परीक्षण मावळे सरांनी केले.यात विघ्नेश सोळसे,श्लोक गुंजाळ,साई माळे,गौरव अडागळे,मयूर पाटील,संस्कार मेनकर, जान्हवी बाजगिरे,आराध्या पवार,मीरा मगर,संस्कृती भुरुक,कुमोद माने, दिव्या साळुंके,ज्ञानेश्वर मुलगीर,श्लोक गिरबोने,वैभव नेटके,रूद्र कदम,शाल्मली सिरसट,वैष्णवी सुरासे,शर्वरी जाधव,प्रतिक घुले,साक्षी पालवे,पायल उदार यांनी सहभाग घेतला.सभेत सौ.गुरव मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मावळे सरांनी बलासभेचे महत्त्व,स्पर्धे बद्दल मार्गदर्शन केले.शिवम कांबळे याचे प्रेरणा पूर्ण असे अध्यक्षीय भाषण झाले.कार्यक्रमाचे आभार ६ वी क मधील श्लोक गिरबोने याने मानले अन् कार्यक्रमाची सांगता झाली.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment