Skip to main content

*पलपब प्रकाशन द्वारा पुस्तक चर्चासत्र : साहित्यिक संवादाचे नवे पर्व*

 एक सप्टेंबर 2024 रोजी  पलपब पालघर समितीने  कवी जयराम कराळे लिखित  'भावतरंग'  या काव्यसंग्रहाच्या  ऑनलाइन  चर्चासत्राचे  आयोजन केले.  पलपब प्रकाशनाच्या कार्यकारी अधिकारी  मा. सौ. लीना पाटील मॅडम, पलपब  प्रकाशनचे  महाराष्ट्र अध्यक्ष  मा.श्री  किरण तोडकर सर  यांच्या  उपस्थितीत  व  मार्गदर्शनाखाली पलपब   पालघर समितीचे  जिल्हाध्यक्ष मा.श्री   संदीप पवार सर  व इतर कार्यकारणी सदस्य  यांनी  भावतरंग या पुस्तकाचे  ऑनलाइन चर्चासत्र  आयोजित केले. पलपब   पालघर समितीचे जिल्हाध्यक्ष  श्री संदीप पवार सर  यांनी  कार्यक्रमाच्या सुरुवातीला  या चर्चासत्राचे अध्यक्ष  ज्येष्ठ कवी  लेखक  मा. श्री  गणपतराव कणसे  सर  प्रमुख पाहुणे  कवी  व लेखक  मा. श्री  सुहास राऊत सर  कवी व लेखक  मा.  प्रतीक मतकर सर  यांचे  शब्दसुमनांनी स्वागत  केले.  तसेच  'भावतरंग'  चे कवी  जयराम कराळे  सर  यांची ओळख करून दिली.
  मा. सुहास राऊत सर यांनी  'भावतरंग' काव्यसंग्रहाचे  विषय,  त्यातील विचारधारा  आणि कवीचे योगदान  यावर चर्चा केली.  कवीने या काव्यसंग्रहामध्ये  कोणते विषय हाताळले आहेत,  आपल्या भावना किती उत्कटतेने  आणि प्रभावीपणे मांडण्याचा  प्रयत्न केला आहे,  शेतकरी व्यथा मांडताना  कवी कसा भाऊक होतो  यावर आपले मत राऊत सर यांनी मांडले.
 मा.  प्रतीक मतकर  सरांनी  कवीचे लिखाणाची शैली,  या काव्यसंग्रहात लिहिलेल्या गझल,  ज्ञानेश्वर माऊली,  विठोबा,  मानवता धर्म,  नामात राघवाच्या,  आजार माणसांना  अशा कवितांवर प्रकाश टाकला.
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. गणपतराव कणसे सर  यांनी  पुस्तकाचे मुखपृष्ठ  या काव्यसंग्रहाला कसे साजेसे आहे,  कविता किती खोल अर्थाच्या आहेत,  प्रत्येक वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत  याची पावती दिली.
  यानंतर  अशा मान्यवरांनी  आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाचे  कोड कौतुक केले  आणि  शुभेच्छा   दिल्याबद्दल  कवी जयराम कराळे सरांनी  मान्यवरांबद्दल  व  पलपब  पालघर समिती बद्दल  आपली कृतज्ञता व्यक्त केली.
पलपब  पालघर जिल्हाध्यक्ष  संदीप पवार सर यांनी  सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल  व  आयोजन समितीचे आभार मानून  या कार्यक्रमाचे सांगता केले  हा कार्यक्रम  आपल्या सर्वांना पलपब  प्रकाशनाच्या  ऑफिशियल  यूट्यूब चैनल वर  लवकरच पाहायला मिळेल.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...