कवि सरकार इंगळी
आंधळी .ता.पलूस.जि.सांगली येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक व गझलकार सिराज करीम शिकलगार यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
सहकार क्षेत्रात ४० वर्षे नोकरी करून वयाच्या ६० व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कविता व गझल क्षेत्रात त्यांची आतापर्यंत ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मुळचे डबल ग्रॅज्युयट ( बी.ए. व बी.कॉम.) असून आता त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (महावीर कॉलेज, कोल्हापूर ) मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली आहे.
Comments
Post a Comment