मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री मनोज महाजन सर आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक सवर्गातून आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी चे उपक्रमशील, तंत्रस्नेही, इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, NEP वर आधारित क्षमता वृद्धी प्रशिक्षण ठाणे जिल्हा तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी बजावली होती असे अष्टपैलू शिक्षक श्री मनोज महाजन यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला
मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातीत टाटा सेंटरमध्ये हा सोहळा ५ सप्टेंबर 2024 रोजी पार पडला
सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, , शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, मा. श्रीमती आय.ए.कुंदन प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मा. शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे साहेब , उपस्थितीत होते
मनोज महाजन सर यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शासन निर्णयाला अनुसरून असलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा व राज्य पातळीवर झालेल्या मुलाखती दरम्यान त्यांची निवड राज्य पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने मनोज महाजन सर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे
Comments
Post a Comment