Skip to main content

*शिक्षक दिन*


"ताई, उद्या तू आईची साडी नेसून शाळेत जाणार!"
"हो ईश, उद्या शिक्षकदिन निमित्त आम्ही दहावीची मुले शाळेत सर्व वर्गांना शिकवणार.
"शिक्षकदिन म्हणजे?"
"रात्री झोपतेवेळी मी तुला सगळे सांगते हं." असे म्हणून ताईने   रोजच्या गोष्टीच्या वेळी ईशला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णनची गोष्ट सांगायला घेतली.

"ईश, तुला माहीत आहे कां?
आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान शिक्षणतत्वज्ञ होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडूमधल्या छोट्या तिरुत्तनी गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल सर्वपल्ली विरास्वामी आणि आई  सिताम्मा होती. घरची स्थिती हलाखीचीच होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांनी पुढील शिक्षण ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल व मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पूर्ण केले. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. आणि नंतरच्या काळात त्यांना कॉलेजचे उपकुलपती बनवण्यात आलें.  ते अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.

त्याकाळी कमी वयात लग्न केले जायचे, त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षी 1903 साली त्यांचे लग्न सिवकामूशी झाले व 108 साली त्यांना एक मुलगीही झाली.

1909 आणि 1918 साली मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज व
मैसूर युनिव्हर्सिटीत दर्शन शास्त्राचे प्रोफेसर म्हणून अनुक्रमे निवडले. तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्येही शिक्षक म्हणूनही कार्यरत झाले.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून म्हैसूर विद्यापीठाने त्यांचा गौरवही केला.
१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

डॉ. राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद आणि विर सावरकरांना  आपले आदर्श मानत असत.आपले भाषण आणि लेखनाच्या माध्यमाने त्यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीशी परिचित केले. राधाकृष्ण बहुआयामी व्यक्तिमत्व असण्यासोबताच भारतीय संस्कृतीशी प्रेम करणारेही होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या आग्रहाने ते विशिष्ट राजदुताच्या रूपात सोव्हिएत संघाच्या राजनैतिक कार्याची पूर्ती करण्यास 1947 ते 1949 पर्यंत संविधान निर्माण सभेचे सदस्य म्हणून कार्य पाहू लागले.
13 मे 1952 पासून 13 मे 1962 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. 
शिक्षण आणि राजनीतीचा क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल 1954 साली त्यांना 'भारत रत्न' हा किताब  देऊन गौरविण्यात आले.
13 मे 1962 ला त्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. 
1962 मध्ये त्यांना ब्रिटिश अकॅडमीचे सदस्यही बनवण्यात आले. 
1963 मध्ये त्यांना ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिटचा सन्मान देण्यात आला.
1968 मध्ये साहित्य अकादमी द्वारा त्यांना सभासद बनवण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् हे महान तत्वज्ञानी वक्ते व लेखक होते. त्यांनी तत्वज्ञान,धर्म मानवता, शिक्षण ह्या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या विचारांनी जगभरातील विद्वान व तत्वज्ञांवर फारच  प्रभाव पडला आहे.त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताच्या शिक्षण प्रणालीला व तत्वज्ञानाला नवी दिशा दिली. त्यांचे काही ग्रंथ खालील प्रमाणे आहेत.

द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर (1918)

इंडियन फिलोसोफी (1923) वोलूम -1

आयडलीस्टीक विव्ह  ऑफ लाईफ  (1929)

रिलीजन अँड सोसायटी (1947)

रिकव्हरी ऑफ फेथ (1956)

ए सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी (1957)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांची ही पुस्तके आपण नक्कीच वाचण्याचा प्रर्यत्न करू व त्यांचे अनुकरणही नक्कीच करू.

अशा ह्या थोर आदर्शवादी व्यक्तीमत्वाच्या महान शिक्षक ह्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1975 ला एका दीर्घ आजाराने  झाला.

त्यांचे विद्यार्थी त्यांचा जन्म दिवस साजरा करण्याचे आयोजन करत होते तेव्हा त्यांनी सांगितले की, "माझा जन्म दिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल."
आणि त्यानुसार 5 सप्टेंबर 1962 पासून त्यांच्या हयातीत शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा जडली. ह्या दिवशी शिक्षकांना सन्मानित केले जाते.
यूनेस्कोने देखील १९९४ मध्ये ५ सप्टेंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी मान्यता दिली.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, देशकार्य आणि शेवटच्या श्वासापर्यंत निभावलेली आदर्श शिक्षकाची भूमिका, यामुळे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिन आपण साजरा करतो नि करत राहणार."
"व्वा! ताई किती महान होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन!
मी उद्या त्यांच्यावरचे छान भाषण ही करीन."
"छान, अशीच उर्जा सर्वांना मिळू दे. झोप आता."
असे बोलून भाऊ बहीण झोपी गेली.

                  ******
शोभा वागळे
मुंबई.
8850466717

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...